...अन् भूमी गेली हरकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 18:20 IST2017-01-14T18:20:11+5:302017-01-14T18:20:11+5:30
‘दम लगाके हईशा’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री भूमी पेडनेकर सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे खूपच उत्साहित आहे. ...

...अन् भूमी गेली हरकून
‘ म लगाके हईशा’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री भूमी पेडनेकर सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे खूपच उत्साहित आहे. तिला असे वाटत आहे की, ती या सिनेमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये लॉँच होत आहे. लवकरच आपण पडद्यावर झळकणार आहोत, या विचाराने ती सध्या हरखून गेली आहे.
सध्या भूमी ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या सिनेमात काम करीत असून, २ जून २०१७ रोजी हा सिनेमा रिलिज होणार आहे. सिनेमाविषयी भूमी सांगतेय की, माझ्या करिअरमधील हा दुसरा सिनेमा आहे. ‘दम लगाके हईशा’नंतर मी ‘टायलेट-एक प्रेम कथा’मध्ये दिसणार असल्याने मला असे वाटत आहे की, मी जणूकाही पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये लॉँच होत आहे.
![]()
२०१५ मध्ये दम लगाके हईशा या सिनेमात भूमी आयुष्यमान खुराणा याच्यासोबत झळकली होती. त्यामध्ये तिची सर्वच अर्थाने वजनदार भूमिका होती. आता ती अक्षय कुमार याच्यासोबत टायलेट-एक प्रेम कथामध्ये दिसणार असून, ती खूपच उत्साहित आहे. मध्यंतरी तिने अक्षय कुमार याचे गोडवे गाताना तो खूप विनम्र अभिनेता असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच उत्साहित करणारा असून, तो खूप विनोदी स्वभावाचा असल्याचे म्हटले होते.
तिच्या बोलण्यावरून असे वाटत होते की, सिनेमात तिची आणि अक्षयची केमिस्ट्री चांगली जमली असावी. मात्र ही जोडी पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकण्यात कितपत यशस्वी होईल हे येत्या काळात स्पष्ट होईलच.