अन् बिप्स भडकली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:34 IST2016-03-06T15:34:19+5:302016-03-06T08:34:19+5:30
बिपाशा बसूच्या बोटातील अंगठी पाहून तिने करणसिंह ग्रोवर याच्यासोबत साखरपुडा उरकल्याची बातमी व्हायरल होताच, बिप्सच्या चाहत्यांना अपार आनंद झाला. ...

अन् बिप्स भडकली...
बिपाशा बसूच्या बोटातील अंगठी पाहून तिने करणसिंह ग्रोवर याच्यासोबत साखरपुडा उरकल्याची बातमी व्हायरल होताच, बिप्सच्या चाहत्यांना अपार आनंद झाला. मात्र खुद्द बिप्स मात्र या बातमीने जाम भडकली. रिंग फिंगरमधील बिपाशाच्या अंगठीचे फोटो व्हायरल झाले. यात बिपाशा कारच्या मागच्या सीटवर बसलेली होती तर करण कारचालकाच्या बाजूच्या सीटवर होता. बिपाशाच्या रिंग फिंगरमधील अंगठी छायाचित्रकारांनी नेमकी टीपली आणि यावरून बिपाशा करणसोबत एज्गेज झाल्याची वार्ता बॉलिवूडमध्ये पिकली. पण काहीच वेळात बिपाशाने टिष्ट्वटरवरून असे काहीही घडले नसल्याचा खुलासा केला. मी कधी लग्न करेल, याची प्रतीक्षा करा. उगाच तर्क लढवू नका. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याबाबत अशा चर्चा होत आहे. कृपया प्रतीक्षा करा.माझ्यावर प्रेम करणाºया सर्वांना मी ही विनंती करते. शेवटी हे माझे आयुष्य आहे,असे टिष्ट्वट बिपाशाने केले आहे.
Wait for me 2announce my wedding when I want to n if I want to.Please stop treating it frivolously.
— Bipasha Basu (@bipsluvurself) March 6, 2016
“For years I have dealt with this constant discussion. Please be patient. After all it’s my life. Humble request to all those who love me.”