आणि दीपिका पादुकोणचा रागाचा पारा चढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 11:25 IST2017-10-19T05:55:20+5:302017-10-19T11:25:20+5:30
सध्या दीपिका पादुकोण तिचा आगामी चित्रपच पद्मावतीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र दुसरीकडे पद्मावतीच्या प्रमोशनला राजपूत करनीने सेनेकडून जोरदार विरोध ...

आणि दीपिका पादुकोणचा रागाचा पारा चढला
स ्या दीपिका पादुकोण तिचा आगामी चित्रपच पद्मावतीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र दुसरीकडे पद्मावतीच्या प्रमोशनला राजपूत करनीने सेनेकडून जोरदार विरोध होतो आहे. गुजरातच्या सूरतमध्ये एक मॉलमध्ये काढण्यात आलेल्या पद्मावतीची रांगोळी करनी सेनेकडून नासधूस करण्यात आली. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 48 तास लागले होते. कलाकाराने 48 तास एका जागेवर बसून ही रांगोळी काढली होती. त्यामुळे ही नासधूस पाहून सिनेमात पद्मावतीची भूमिका साकरत असलेल्या दीपिका पदुकोणचा संताप अनावर झाला. हे कुठे तरी थांबायला हवं आणि अशा कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई व्हायला हवी, अशी मागणी दीपिकाने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली आहे.
![]()
याआधी ही पद्मावतीच्या शूटिंग दरम्यान करनीने सेनेने राजस्थानमध्ये सेटवर जाऊन गोंधळ घातला होता. याच दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली होती. याशिवाय संजय लीली भन्साळी याचा पुतळा ही जाळण्यात आला होता. आधी हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज करण्यात येणार होता. मात्र करनीने सेनेने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घातलेल्या गोंधळामुळे शूटिंग सुरु व्हायला उशीर झाला. त्यामुळे आता हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचा फर्स्ट लूक जेव्हा रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी देखील राजपूत करणी सेनेने ‘इशारों इशारों में’ धमक्या देणे सुरु केले होते. ज्यावेळी रणवीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पद्मावतीचे पोस्टर शेअर केले होते. त्यावेळी अप्रत्यक्षरित्या रणवीरला ‘रानी पद्मावती अगर रानी पद्मावती बनकर पधार रही हैं तो उनका स्वागत हैं, वरना रुकावट के लिए खेद होगा’ असे ट्वी करुन धमकी दिली होती. केवळ एवढेच नाही तर ‘पद्मावती’त तथ्यांना जराही विकृत केले गेले तर आम्ही या चित्रपटाचे स्क्रिनिंग हाणून पाडू, असा इशाराही करणी सेनेने दिला आहे.
पद्मावती चित्रपट राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण, शाहिद कपूर महारावल रतन सिंह अर्थात पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत तर रणवीर सिंग दिल्लीचा सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.