n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">ऐश्वर्या राय सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान एका पत्रकाराने सलमान खानसोबत चित्रपट करण्याचा तुझा काही विचार आहे का असे तिला विचारले. प्रश्न ऐकताच ऐश्वर्या प्रचंड चिडली. ऐश्वर्या एवढी चिडली होती की, ती त्या कार्यक्रमातून लगेचच निघून गेली. एवढेच नव्हे तर प्रश्न विचारल्यानंतरचा फुटेजही तिने डीलिट करायला लावला. ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपला इतके वर्षं होऊनही तिचा राग आजही थोडाही निवळलेला नाही हेच यातून दिसून येतेय.