...अन् पुन्हा शूटींग थांबली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 22:15 IST2016-02-21T04:19:34+5:302016-02-20T22:15:38+5:30
कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांनी पुन्हा ‘जग्गा जासूस’ ची शूटिंग थांबवल्याचे कळते आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, त्या दोघांनी म्हणे ...

...अन् पुन्हा शूटींग थांबली..
क टरिना कैफ आणि रणबीर कपूर यांनी पुन्हा ‘जग्गा जासूस’ ची शूटिंग थांबवल्याचे कळते आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, त्या दोघांनी म्हणे संपूर्णपणे शूटिंगवेळी एकमेकांशी बोलणे थांबवले आहे. रणबीर ‘जग्गा जासूस’ साठी दररोज शूटिंग करतो आहे. पण कॅटने सेटवर येणेच बंद करून टाकले आहे. मागील महिन्यापर्यंत कमीत कमी ते एकमेकांशी बोलत तरी होते.
आता तर त्यांनी ते देखील बंद करून टाकले आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटाला या दोघांच्या ब्रेकअपमुळे ग्रहण लागल्यासारखे झाले आहे. त्याचबरोबर कॅटने आता जग्गा जासूसच्या भरवशावर न राहता नित्या मेहरा यांच्या टाईम-ट्रॅव्हल-रोमान्स ‘बार बार देखो’ चित्रपटाची शूटिंग सिद्धार्थ मल्होत्रासोबत सुरू केली आहे.
व्हॅलेंटाईन डे नंतर खरंतर ‘जग्गा जासूस’ साठी कॅट शूटिंग सुरू करणार होती. पण आता तिने बार बार देखो साठी शूटिंग सुरू केले आहे. रणबीर कपूरसाठीचेच शूटिंग बाकी असून २० दिवसांनंतर २२ मार्चला ते दोघेही आता शूटिंगसाठी मोरोक्कोला जाणार आहेत.
source ; indiglamour