​... आणि आमिर खानच्या दोन्ही पत्नी दिसल्या एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 10:46 IST2018-01-13T05:16:19+5:302018-01-13T10:46:19+5:30

बॉलिवूडमधील झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या कलाकारांचे आयुष्य हे आपल्यापेक्षा खूपच वेगळे असते. खऱ्या आयुष्यात सवत माझी लाडकी म्हणत आपल्या सवतीसोबत ...

... and Aamir Khan's wife are seen together | ​... आणि आमिर खानच्या दोन्ही पत्नी दिसल्या एकत्र

​... आणि आमिर खानच्या दोन्ही पत्नी दिसल्या एकत्र

लिवूडमधील झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या कलाकारांचे आयुष्य हे आपल्यापेक्षा खूपच वेगळे असते. खऱ्या आयुष्यात सवत माझी लाडकी म्हणत आपल्या सवतीसोबत वेळ घालवताना आपल्याला कोणतीही स्त्री दिसत नाही. पण बॉलिवूडमध्ये एकमेकांच्या सवत असलेल्या स्त्रिया देखील एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते. आमिर खानची पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव यांनी नुकताच एकमेकांसोबत खूपच चांगला वेळ घालवला.
पाणी फाऊंडेशनच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत किरण राव आणि रिना दत्ता एकत्र आल्या होत्या. मलबार हिल येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत किरण आणि रिनाला एकत्र पाहायला मिळाले. त्या दोघी एखाद्या मैत्रिणींसारख्या एकमेकांसोबत गप्पा मारत होत्या. आमिरदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. आमिरची पूर्व पत्नी रिना आणि सध्याची पत्नी किरण यांच्यातील मैत्री हे या पत्रकार परिषदेचे विशेष आकर्षण ठरले.
आमिर खान आणि रिना दत्ता यांचे लग्न १८ एप्रिल १९८६ ला झाले होते. कयामत से कयामत तक या चित्रपटातील पापा कहेते है या गाण्यात प्रेक्षकांना रिनाची झलक देखील पाहायला मिळाली होती. त्या दोघांना जुनैद आणि इरा अशी दोन मुले आहेत. पण त्या दोघांनी डिसेंबर २००२ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ रिना करत आहे. रिनासोबत घटस्फोट झाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २८ डिसेंबर २००५ ला आमिर खानने किरण रावशी लग्न केले. लगान या चित्रपटाच्या वेळी किरण राव ही दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरची असिस्टंट होती. याच चित्रपटाच्या वेळी किरण आणि आमिर खान यांच्या अफेअरला सुरुवात झाली. किरण आणि आमिर यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. 
केवळ किरण आणि रिना या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत असे नाही तर रिनाच्या मुलांसोबत देखील किरणचे नाते खूपच चांगले आहे. खान कुटुंबात काही कार्यक्रम असल्यास हे सगळे नेहमीच एकत्र हजेरी लावतात. 

Also Read : शेजारी राहणा-या मुलीवर लट्टू झाला होता आमिर खान, रक्ताने लिहिले होते पत्र!

Web Title: ... and Aamir Khan's wife are seen together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.