'भूल भुलैया ४'मध्ये 'मंजुलिका' बनणार अनन्या पांडे? कार्तिक आर्यनच्या पोस्टमधून मिळाली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:46 IST2025-10-31T19:44:57+5:302025-10-31T19:46:44+5:30
Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकताच म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी आपला २७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत मोठे सेलिब्रेशन केले.

'भूल भुलैया ४'मध्ये 'मंजुलिका' बनणार अनन्या पांडे? कार्तिक आर्यनच्या पोस्टमधून मिळाली हिंट
अभिनेत्री अनन्या पांडे हिने नुकताच म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी आपला २७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत मोठे सेलिब्रेशन केले. चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. यादरम्यान कार्तिक आर्यनने अभिनेत्रीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट पाहून आता युजर्स असा अंदाज लावत आहेत की, अभिनेत्री लवकरच कार्तिकसोबत 'भूल भुलैया ४'मध्ये दिसणार आहे.
कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे लवकरच 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळे अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकने चित्रपटाच्या सेटवरील एक पडद्यामागील कॉमेडी व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या सुरुवातीला 'भूल भुलैया ४' असे लिहिलेले दिसते. व्हिडीओमध्ये अभिनेता अनन्याला चिडवताना दिसला, तर अनन्या म्हणते, 'माझे गाणे.' त्यावर कार्तिकने विचारले, 'तुझे गाणे?' यानंतर अनन्याने लगेच आपले शब्द बदलले आणि म्हणाली की 'आमचे गाणे...'
'भूल भुलैया ४'मध्ये अनन्या 'मंजुलिका' बनणार?
अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या व्हिडीओमध्ये त्यांची केमिस्ट्री नाही, तर 'भूल भुलैया ४' हा शब्द नोटीस केला. यानंतर युजर्समध्ये मोठी चर्चा रंगली. यामध्ये काही युजर्स म्हणाले की, 'चित्रपटाच्या चौथ्या भागात अनन्या पांडे 'मंजुलिका'च्या भूमिकेत दिसू शकते.' मात्र, अनन्याने यावर कोणताही खुलासा केला नाही, पण व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली, "कार्तिक, तुझा वाढदिवस पण येतोय. वाट बघ!"
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'ची रिलीज डेट
कार्तिकची ही पोस्ट फक्त मजा म्हणून होती. निर्मात्यांनी अजून 'भूल भुलैया ४' बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' बद्दल बोलायचे झाल्यास, कार्तिक आणि अनन्याचा हा चित्रपट अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होऊ शकतो.
