Confirm! आदित्य रॉय कपूरला डेट करतेय अनन्या पांडे, अभिनेत्रीच्या कपड्यांनी केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:50 PM2023-12-02T16:50:27+5:302023-12-02T16:50:52+5:30

अभिनेत्रीच्या या कपड्यांमुळे अनन्या आणि आदित्य रॉय कपूरमधील रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. 

ananya panday flaunts kapur tag tshirt amid dating rumours with aditya roy kapoor | Confirm! आदित्य रॉय कपूरला डेट करतेय अनन्या पांडे, अभिनेत्रीच्या कपड्यांनी केली पोलखोल

Confirm! आदित्य रॉय कपूरला डेट करतेय अनन्या पांडे, अभिनेत्रीच्या कपड्यांनी केली पोलखोल

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनन्या आणि आदित्यला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. पार्टीमधील अनन्या आणि आदित्यचे फोटोही व्हायरल झाले होते. 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनन्याने आदित्यबरोबरच्या रिलेशनशिपवर मौन सोडत चांगले मित्र असल्याचं म्हटलं होतं. पण, अनन्या आणि आदित्य एकमेकांना डेट करत असल्याचं आता कन्फर्म झालं आहे. 

अनन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नुकतंच अनन्याला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं.  या व्हिडिओमध्ये अनन्या गुलाबी रंगाचे टीशर्ट आणि पँट परिधान केली आहे. 'इन्स्टंट बॉलिवूड' या पेजवरुन शेअर करण्यात आलेला अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अनन्याने घातलेल्या टीशर्टवर कपूर असं लावलेलं दिसत आहे. तिच्या या कपड्यांची प्रचंड चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या या कपड्यांमुळे अनन्या आणि आदित्य रॉय कपूरमधील रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. 

दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल २'मध्ये अनन्या मुख्य भूमिकेत होती. लवकरच ती 'खो गये हम कहा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्याने दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबईत स्वत:चं घरही खरेदी केलं आहे. 
 

Web Title: ananya panday flaunts kapur tag tshirt amid dating rumours with aditya roy kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.