बाबो, अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनन्या पांडे केलं लीप फिलर, नवे फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:47 IST2025-06-13T11:46:16+5:302025-06-13T11:47:33+5:30
अनन्याच्या नव्या फोटोवर चर्चा, नेटकऱ्यांचा सवाल, "लिप सर्जरी केलीस का?"

बाबो, अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनन्या पांडे केलं लीप फिलर, नवे फोटो व्हायरल!
Ananya Panday Lips Surgery: अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनन्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या अनन्याचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अनन्यानं लीप फिलर सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.
अनन्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या टॅन्ड लूकमध्ये पाउट करताना दिसत आहे. या दरम्यान, ती कारमध्ये बसलेली आहे. अनन्याचे जुने फोटो आणि आता तिनं शेअर केलेले फोटो लक्षपुर्वक पाहिले तर तिच्या ओठांचा आकार बदलेला दिसून येत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी 'ती दिशा पटानीसारखी दिसत आहे' अशा कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने विचारलं, "फिलर्स??? बोटॉक्स??? का?". कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी फिट आणि परफेक्ट दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करुन घेत असतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ओठांवर, नाकांवर सर्जरी करुन त्यांचा लूक बदलला आहेत.
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' या चित्रपटात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं शुटिंग सध्या क्रोएशियाच्या किनारी भागात सुरू आहे. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी 'पती पत्नी और वो' या चित्रपटात कार्तिक आणि अनन्याने पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दोघांमधील केमिस्ट्री आणि मैत्रीमुळे त्यांच्यात रिलेशनशिप असल्याच्या अफवाही रंगल्या होत्या.