'त्या' हॅण्डसम हंकला डेट करतेय अनन्या पांडे, आता खुद्द 'माय वर्ल्डवाइड' म्हणत नातं केलं कन्फर्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:33 IST2025-03-28T19:33:00+5:302025-03-28T19:33:20+5:30

खुद्द अनन्यानं  'माय वर्ल्डवाइड' म्हणत 'त्या' हॅण्डसम हंकसोबतचं नात कन्फर्म केलं आहे. 

Ananya Panday Drops A Comment On Rumoured Boyfriend Walker Blanco She Says My Worldwide | 'त्या' हॅण्डसम हंकला डेट करतेय अनन्या पांडे, आता खुद्द 'माय वर्ल्डवाइड' म्हणत नातं केलं कन्फर्म!

'त्या' हॅण्डसम हंकला डेट करतेय अनन्या पांडे, आता खुद्द 'माय वर्ल्डवाइड' म्हणत नातं केलं कन्फर्म!

Ananya Panday Dating Rumours: अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनन्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनन्याच्या कोणाला डेट करत याच्या सुद्धा चर्चा असतात. अनेक सेलिब्रिटींसोबत अनन्या हिचं नाव जोडलं जातं. आता खुद्द अनन्यानं  'माय वर्ल्डवाइड' म्हणत 'त्या' हॅण्डसम हंकसोबतचं नात कन्फर्म केलं आहे. 

अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत होती. पण, दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अनन्या वॉकर ब्लँको याला डेट करतेय. या दोघांना अनंत अंबानीच्या लग्नात रोमँटिक गाण्यावर नाचतानाही पाहिलं गेलं होतं. मात्र, या जोडप्याने या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण, आता अन्यानं थेट वॉकर ब्लँकोसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. नुकतंच वॉकर ब्लँको याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. यावर अभिनेत्रीनं 'माय वर्ल्डवाइड' अशी कमेंट करत प्रेम जाहीर केलं आहे.  अनन्याची बहीण रीसा पांडेनेही वॉकर ब्लँकोच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. यामुळे, पुन्हा एकदा अनन्या आणि वॉकर चर्चेत आले आहेत.

वॉकर ब्लँको हा सध्या जामनगर येथील अंबानींच्या वनतारा येथे काम करतो, अशी माहिती आहे. एका रिपोर्टनुसार वॉकर ब्लँको हा अमेरिकेचा रहिवासी आहे. अनन्याच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त वॉकरने इन्स्टाग्रामवर 'हॅपी बर्थडे ब्यूटीफुल! तू खूप खास आहेस! आय लव्ह यू, अ‍ॅनी!' अशी एक खास पोस्ट केली होती. अनन्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'केसरी २' (Kesari 2) या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकणार आहे.  पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 
 

Web Title: Ananya Panday Drops A Comment On Rumoured Boyfriend Walker Blanco She Says My Worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.