अनंत-राधिकाच्या लग्नात बेभान होऊन नाचली अनन्या पांडे, हळदी सोहळ्यातील व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:37 IST2024-07-15T13:36:40+5:302024-07-15T13:37:08+5:30
Anant-Radhika Wedding : अनन्याने अनंत-राधिकाच्या हळदी समारंभालाही हजेरी लावली होती. या हळदी समारंभातील तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नात बेभान होऊन नाचली अनन्या पांडे, हळदी सोहळ्यातील व्हिडिओ समोर
Anant Ambani Radhika Merchant Wedding : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अनंत आणि राधिका मर्चंटचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला पार पडला. त्यांच्या ग्रँड वेडिंग सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
अनंत-राधिकाच्या वेडिंग सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही या सोहळ्याला उपस्थित होती. अनन्याने अनंत-राधिकाच्या हळदी समारंभालाही हजेरी लावली होती. या हळदी समारंभातील तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनन्या सिंगर राहुल वैद्यच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. राहुल वैद्यने त्याच्या आवाजाने अनंत-राधिकाची हळद गाजवली. तर अनन्याच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
विरल भयानी या पापाराझी पेजवरुन अनन्याचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. राहुल या व्हिडिओत "दमा दम मस्त कलंदर" हे गाणं गाताना दिसत आहे. राहुलच्या या गाण्यावर ठेका धरत अनन्या भांगडा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनन्याला पहिल्यांदाच बेभान नाचताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडसह या वेडिंग सोहळ्याला हॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर अनंत-राधिकाचं वेडिंग रिसेप्शन आणि आशीर्वाद सेरेमनीही ठेवण्यात आली होती. मराठी सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.