शाहरुख खानबाबत आनंद एल राय यांनी केले 'हे' वक्तव्य, पहिल्यांदा काम करतायेत एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 12:04 IST2018-04-02T06:34:58+5:302018-04-02T12:04:58+5:30

बॉलिवूडमध्ये निर्माते आणि दिग्दर्शक आनंद एल.राय यांनी शाहरुख खानचे कौतुक केले आहे. आनंद एल राय यांनी तेनु वेड्स मनु, ...

Anand L. Rai made this statement about Shahrukh Khan, first time work together for work | शाहरुख खानबाबत आनंद एल राय यांनी केले 'हे' वक्तव्य, पहिल्यांदा काम करतायेत एकत्र काम

शाहरुख खानबाबत आनंद एल राय यांनी केले 'हे' वक्तव्य, पहिल्यांदा काम करतायेत एकत्र काम

लिवूडमध्ये निर्माते आणि दिग्दर्शक आनंद एल.राय यांनी शाहरुख खानचे कौतुक केले आहे. आनंद एल राय यांनी तेनु वेड्स मनु, रांझना आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आनंद राय सध्या शाहरुख सोबत झिरो चित्रपटासाठी काम करतायेत. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे जो प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडला आहे.   

शाहरुखबाबत बोलताना ते म्हणाले, ''मी हे बघून हैराण आहे की 25 वर्षे यशाचा शिखरावर राहिल्यानंतर ही एखाद्या व्यक्तीमध्ये लहान मुलांसारखी ऊर्जा असू शकते.'' पुढे ते म्हणाले,''मी माझ्या आयुष्यात त्याच्या ऐवढा आज्ञाधारी अभिनेता बघितला नाही. सेटवरची त्याची एनर्जी एखाद्या तरुण मुलासारखी असते. एखाद्या दिग्दर्शकाला सेटवर भेटणार सगळ्यात चांगला नवोदित अभिनेता आहे. मी त्याच्याकडून हे सगळे शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.''  

झिरोमध्ये शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. सलमान खानही शाहरुखच्या प्रेमापोटी या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे.  यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.

ALSO READ :   डॉन-३’मधून प्रियांका चोप्राचा पत्ता कट; शाहरुख खानने शोधली नवी ‘जंगली बिल्ली’!

 

Web Title: Anand L. Rai made this statement about Shahrukh Khan, first time work together for work