आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे'चे शूटिंग झाले पूर्ण, जादूगच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 17:40 IST2021-03-29T17:35:11+5:302021-03-29T17:40:02+5:30

  या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर सारा अली खान आणि दक्षिण अभिनेता धानुष देखील मुख्य भूमिकेत दिसतील.

Anand l rai film atrangi ray completed akshay kumar will be seen in the role of magician | आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे'चे शूटिंग झाले पूर्ण, जादूगच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे'चे शूटिंग झाले पूर्ण, जादूगच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'अतरंगी रे' चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचा फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय जादूगारच्या गेटअपमध्ये दिसत आहे.  या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर सारा अली खान आणि दक्षिण अभिनेता धानुष देखील मुख्य भूमिकेत दिसतील.

अक्षयने इन्स्टाग्रामवर स्वत: चा एक फोटो शेअर करत लिहिले, "अतरंगी रे चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. मी आता आनंद एल राय यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. माझा सहकलाकार धनुष आणि सारा यांनाही या चित्रपटासाठी शुभेच्छा. "  याशिवाय अक्षयने या चित्रपटाचे लेखक हिमांशू शर्मा आणि संगीतकार ए.आर. रहमान यांचेही आभार मानले आहेत. सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष स्टारर 'अतरंगी रे' हा 2021 मधील मोस्टअवेटेड सिनेमा आहे. 

काही दिवसांपूर्वीच अक्षयचा 'राम सेतू' सिनेमाचा मुहूर्त आयोध्येत पार पडला.यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहे. राम सेतु चित्रपटाची अरूण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा सहनिर्मिती करत आहेत. क्रिएटिव्ह निर्माते डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी आहेत.

Web Title: Anand l rai film atrangi ray completed akshay kumar will be seen in the role of magician