प्यार में 'अनलकी' रणबीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 09:16 IST2016-10-19T22:47:19+5:302016-10-20T09:16:55+5:30
सर्वांनाच आपल्या मनाप्रमाणे प्रेम मिळेलच हे सांगणे जरा कठीण आहे. मात्र काही लोकांना प्रेम मिळते तर काही ते मिळविण्यासाठी ...

प्यार में 'अनलकी' रणबीर
आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनात व्यस्त असलेल्या रणबीरने हे एका कार्यक्रमात आपल्या प्रेमाचा उल्लेख करताना तो म्हणाला, पत्ते खेळताना व प्रेमात मने जुळण्यासाठी भाग्याची गरज असते. मात्र माझे तसे भाग्यच नाही. मला दोन्ही गोष्टीत अपयशच आले आहे. करण जोहर याने दिग्दर्शित केलेल्या ऐ दिल है मुश्किलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन व अनुष्का शर्मा या दोन अभिनेत्रींसोबत रणबीर कपूर दिसणार आहे. जमाई राजाच्या आगामी भागात तो आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे, यावेळी तो माहीवर असलेले सत्याचे प्रेम पटवून देणार आहे.
28 आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र पाकिस्तानी कलावंत असल्याच्या मुद्दयावरून ‘ऐ दिल...’ हा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र,गुजरात, कर्नाटक व गोवा येथील सिंगल स्क्रिन सिनेमा मालकांनी या चित्रपटाचे प्रदर्शन करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी कलावंतासोबत यानंतर काम करणार नाही असा जाहीर करीत या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ द्यावे अशी विनंती करण जोहरने युट्युबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून केली आहे.
चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आली असतानाच प्रमोशनल एक्टीव्हिटीनेही जोर पकडला आहे. भाग्य रणबीरच्या सोबत असेल तर नक्कीच हा चित्रपट क ोणत्याही अडचणीशिवाय प्रदर्शित होईल. अन्यथा भाग्याने पुन्हा एकदा रणबीरला धोका दिला असेच म्हणावे लागले.
रणबीरच्या प्रेमाच्या यादीत दीपिका पादुकोन व कॅटरिना कैफचेही नाव आहे.