एमी जॅकसन म्हणते, ‘मला सलमानसोबत डेट करायला आवडेल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 21:42 IST2017-02-17T15:13:34+5:302017-02-17T21:42:43+5:30

आतापर्यंत एकटा सलमान आपल्या संस्थेचा प्रचार करीत होता. आता सलमान खान एमी जॅकसनसोबत ‘बिर्इंग ह्युमन’चे प्रमोशन करणार आहेत.

Amy Jackson says, 'I would love to have a date with Salman' | एमी जॅकसन म्हणते, ‘मला सलमानसोबत डेट करायला आवडेल’

एमी जॅकसन म्हणते, ‘मला सलमानसोबत डेट करायला आवडेल’

लिवूडचा दंबग सलमान खान ५१ वर्षांचा असला तरी ‘मोस्ट एलिजेबल बॅचलर’ म्हणून आजही अनेक मुलीच्या हृदयात घर करून आहे. अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आले आहे. दरम्यान, सलमानचे नाव अभिनेत्री एमी जॅकसनसोबत जोडण्यात आले होते. असेही सांगण्यात येत होते की एमी सलमानची गर्लफ्रेंड आहे. आता पुन्हा या चर्चेला उधान आले आहे. ‘मला सलमानसोबत डेट करायला आवडेल’ असे एमीने सांगितल्याने याला दुजोराच मिळाला आहे. 

सलमान खान व एमी जॅकसन यांच्या मैत्रीचे किस्से सध्या बॉलिवूडमध्ये व्हायरल होत आहे. यामागचे कारणही तसेच आहे. सलमान खानची चॅरीटेबल संस्था बिर्इंग ह्युमनचा नवा चेहरा एमी जॅकसनला बनविण्यात आले आहे. एमीने ही आनंदाची बातमी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. हा फोटो शेअर करताना एमीने ‘बीर्इंग ह्युमन संस्थेशी जोडले गेल्याने मला सर्वाधिक आनंद झाला आहे. सलमान तू सर्वोत्कृष्ट आहेस.’ असे कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहून दोघांत काहीतरी शिजते आहे याची कल्पना येऊ शकते.



दरम्यान एमीला तुला सलमानला डेट करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर क्षणाचाही विलंब न करता ‘कोणाला सलमानशी डेट करायला आवडणार नाही’ असे उत्तर दिले. एमी म्हणाली, तो माझा खूप चांगला मित्र आहे. माझ्यात आत्मविश्वास वाढवण्याचे काम त्याने केले. तो माझा चांगला मित्र आहे. 



सलमानसोबत एमी यापूर्वी किक या चित्रपटात काम करणार होती. मात्र त्याचवेळी ती दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर याच्या ‘आय’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने ती यात काम करू शकली नाही. सलमानचा भाऊ सोहल खान दिग्दर्शित ‘फिक्री अली’ या चित्रपटात तिने काम केले होते. तेव्हापासूनच दोघांबद्दलच्या बातम्या येत होत्या. काही दिवसांपूर्वी रजनीकांत व अक्षयकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘२.०’ या चित्रपटाच्या पोस्टर लाँच प्रसंगी सलमान खान अचानक तेथे हजर झाला होता. तेव्हा देखील तो एमीसाठीच आला आहे असे सांगण्यात आले होते. ‘२.०’ मध्ये एमीची देखील महत्त्वाची भूमिका आहे. एमी जॅकसनला ‘बिर्इंग ह्युमन’चा चेहरा बनवून सलमानने एक संदेश दिला आहे. आतापर्यंत एकटा सलमान आपल्या संस्थेचा प्रचार करीत होता. आता सलमान खान एमी जॅकसनसोबत ‘बिर्इंग ह्युमन’चे प्रमोशन करणार आहेत. 

">http://

Web Title: Amy Jackson says, 'I would love to have a date with Salman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.