Amruta Khanvilkar : राम गोपाल वर्मांसोबत तीन चित्रपट, अमृता म्हणाली, ' लोक मला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 09:14 IST2023-02-11T09:13:10+5:302023-02-11T09:14:43+5:30

अमृताने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत तीन चित्रपट केले आहेत.

Amruta Khanvilkar did Three films with Ram Gopal Varma says people used to call me Ramu's | Amruta Khanvilkar : राम गोपाल वर्मांसोबत तीन चित्रपट, अमृता म्हणाली, ' लोक मला...'

Amruta Khanvilkar : राम गोपाल वर्मांसोबत तीन चित्रपट, अमृता म्हणाली, ' लोक मला...'

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या 'पटलं तर घ्या' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अमृताने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. खूप कमी जणांना माहित असेल पण अमृताने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत तीन चित्रपट केले आहेत. यामुळे तिला लोक 'रामूज' म्हणायचे असा खुलासा तिने शोमध्ये केला.

'पटलं तर घ्या' कार्यक्रमात अमृता म्हणाली, 'राम गोपाल वर्मा यांच्या 'कॉन्ट्रॅक्ट' या सिनेमात मी छोटी भूमिका केली होती. त्यात माझे तीन-चारच सीन्स होते. नंतर त्यांनी मला लगेचच दुसऱ्या चित्रपटाची ऑफर दिली. ‘फूंक’ असं त्या सिनेमाचं नाव होतं. राम सरांबरोबर मी लागोपाठ तीन चित्रपट केल्यामुळे मला ‘रामूज’ असं संबोधलं जायचं. माझ्याबद्दल असं का छापून येतंय हे आधी मला कळलंच नाही. एकाच दिग्दर्शकाबरोबर जास्त चित्रपट केल्यानंतर असं बोललं जातं हे नंतर मला कळालं'

अमृता म्हणाली, 'मी आधी हिंदी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. पण फारसं चांगलं हिंदी मला बोलता यायचं नाही. नंतर मी हिंदी, उर्दू दोन्ही भाषांचा अभ्यास केला.तेव्हा मी खूप घाबरायचे. त्यामुळे मी जास्त प्रयत्नही केले नाहीत.मार्गदर्शन करायलाही कोणी नव्हतं. आता जी अमृता तुम्हाला दिसते, तशी मी तेव्हा नव्हते या गोष्टीची मला नेहमीच खंत आहे.'

हिंदी चित्रपटातील करिअर

हिंदी चित्रपटात करिअर सुरू ठेवायला हवं होतं, याबाबत खंत वाटते का?” या प्रश्नावर अमृता म्हणली, “ खंत अशी नाही पण मी खूप घाबरायचे. मला भीती वाटायची. हिंदी भाषेवर माझं तितकं प्रभुत्व नव्हतं. माझी हिंदी व्हर्नक्युलर(प्रादेशिक भाषा बोलणारी) वाटायची असं तेव्हा मला लोक म्हणायचे. मी चांगली दिसत नाही, तशी फिगर नाही असंही मला वाटायचं”.

अमृताने 'राजी' या सिनेमातही भूमिका साकारली आहे. तर तिचा मराठी सिनेमा 'चंद्रमुखी' प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. अमृता मराठी असो किंवा हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत तिने अभिनयाची छाप पाडली आहे.

Web Title: Amruta Khanvilkar did Three films with Ram Gopal Varma says people used to call me Ramu's