​ लहान पडद्यावर यायला घाबरत होती अमृता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 09:59 IST2016-02-29T16:59:51+5:302016-02-29T09:59:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव लवकर ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर येत आहे. मात्र तुम्हाला माहितीयं, ...

Amrita was afraid of going to the small screen | ​ लहान पडद्यावर यायला घाबरत होती अमृता

​ लहान पडद्यावर यायला घाबरत होती अमृता

लिवूड अभिनेत्री अमृता राव लवकर ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर येत आहे. मात्र तुम्हाला माहितीयं, आत्तापर्यंत छोट्या पडद्यावर यायला अमृता  घाबरत होती. कारण छोट्या पडद्यावर आल्याने आपण कमालीचे व्यस्त होऊ अशी भीती तिला होती. छोट्या पडद्यावर काम करणाºया कलाकारांना दिवसातले कित्येक तास काम करावे लागते. माझी बहीण प्रतिकाने टीव्ही शो केला, तिची व्यस्त दीनचर्या मी बघून होते. त्यामुळे मी घाबरून होते. यापूर्वीही अनेक प्रस्ताव आले पण यामुळेच मी त्यांना नकार दिला. पण ‘मेरी आवाज ही पहचान है’चा प्रस्ताव आला तेव्हा ही एक मर्यादीत श्रृंखला असल्याचे मला कळले. त्यामुळे मला काही ठराविक दिवस शुटींग करावे लागणार होते. त्यामुळे मी लगेच या प्रस्तावाला होकार दिला, असे अमृताने सांगितले. 

Web Title: Amrita was afraid of going to the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.