अमृता सुभाष म्हणते, बॉलिवूडच्या या अभिनेत्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:24 IST2019-01-15T20:23:40+5:302019-01-15T20:24:34+5:30
रणवीर सिंग व आलिया भट यांचा आगामी चित्रपट गली ब्वॉयचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

अमृता सुभाष म्हणते, बॉलिवूडच्या या अभिनेत्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही
रणवीर सिंग व आलिया भट यांचा आगामी चित्रपट गली ब्वॉयचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री अमृता सुभाषरणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील अनुभवाबाबत सांगताना तिने रणवीरची खूप प्रशंसा केली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता म्हणाली की, माझे काम योग्य लोकांनी पाहिले आणि त्याचे फळ मला लगेच मिळाले. झोयाने माझे रमन राघव २.० मधील काम पाहिले होते. त्यावरच गली बॉय साठी तिने माझी निवड केली. मी स्वत:ला खूप नशीबवान समजते की, मला झोया आणि टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली.
अमृताने या सिनेमात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्या अनुभवाबद्द्ल अमृता म्हणते की, ‘रणवीर खरेच सगळ्यात मिसळून राहणारा कलाकार आहे. त्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही. त्याच्याशी व्यक्तिरेखेबाबत चर्चा करताना खूप काही नवे अनुभवण्यास मिळाले.’
'गली ब्वॉय' सिनेमात झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची गोष्ट पाहायला मिळणार आहे. २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाचा पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. अमृताने सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास खूप मजा आली असे अमृताने पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमृता पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करत आहे. या चित्रपटातील तिची बहुतेक दृश्य ही रणवीर सोबत चित्रीत करण्यात आली आहेत. 'गली ब्वॉय'चे बरचेस चित्रीकरण हे धारावीमध्ये करण्यात आले आहे.