अमृता राव आणि आरजे अनमोल अनोख्या अंदाजात सांगणार लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 19:09 IST2021-10-18T19:08:09+5:302021-10-18T19:09:37+5:30
अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलने अखेर आपल्या प्रेम कहाणी सर्वांसमोर जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

अमृता राव आणि आरजे अनमोल अनोख्या अंदाजात सांगणार लव्हस्टोरी
अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलने अखेर आपल्या प्रेम कहाणी सर्वांसमोर जाहीर करण्याचा निर्णय घेतला. ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर अमृता आणि अनमोल पहिल्यांदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रेम कहाणीला कपल ऑफ थिंग्स असे शीर्षक देत आपल्या चाहत्यांना एका वेगळ्या पद्धतीने आणि याआधी कधी न सांगितलेल्या पद्धतीने सांगणार आहेत.
अमृता राव आणि आरजे अनमोल हे बॉलिवूडमधील जोडपे आपले लव्ह लाइफ आणि खासगी जीवनातील गोष्टी शेअर करत नाहीत. आतापर्यंत त्या दोघांना कोणत्याच प्लॅटफॉर्मवर आपल्या नात्याबद्दल भाष्य करताना दिसले नाही. वास्तविकतेत पहिल्यांदाच असे होणार आहे जेव्हा अमृता आणि अनमोल एकत्र एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. यावेळी ते त्यांच्या रोमान्सशी निगडीत आणि खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबद्दल सांगताना दिसणार आहे. याबद्दल अमृता सांगते की, एक फिल्म स्टार आणि एक रेडिओ जॉकीमधील प्रेम कहाणी जगात यापूर्वी कधीच झाली नाही. आमची प्रेम कहाणी वास्तविकतेत अनोखी आणि परिकथेसारखी आहे.
ती पुढे म्हणाली की, आमचे नाते नेहमीच आमच्यासाठी खूप पवित्र राहिले आहे आणि आता आम्ही जगासाठी दरवाजे खोलत आहे. आम्हीदेखील चाहत्यांसमोर तशाच रोमांचक पद्धतीने करू शकू, अशी आम्ही आशा करतो.