विवाह या चित्रपटातील अमृता प्रकाश आता दिसते ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 15:59 IST2018-02-23T10:28:26+5:302018-02-23T15:59:53+5:30
शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या जोडीचा विवाह हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला ...

विवाह या चित्रपटातील अमृता प्रकाश आता दिसते ग्लॅमरस
श हिद कपूर आणि अमृता राव यांच्या जोडीचा विवाह हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला भावल्या होत्या. या चित्रपटाला आता जवळजवळ ११ वर्षं झाले आहेत. हा एक कौटुबिंक ड्रामा असून या चित्रपटात प्रेक्षकांना एक प्रेमकथा देखील पाहायला मिळाली होती. या चित्रपटात अमृता प्रकाशने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या वेळी अमृताचे वय खूपच कमी होते. पण या चिमुरडीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही अमृता प्रकाश आता मोठी झाली असून ती खूपच ग्लॅमरस दिसायला लागली आहे.
अमृता प्रकाशने वयाच्या चौथ्या वर्षापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. केरळमधील एका चप्पलच्या ब्रँडसाठी तिने पहिली जाहिरात केली होती. या जाहिरातीनंतर तिने डाबर, रसना, ग्लूकॉन डी, सनसिल्क, लाइफ ब्वॉय अशा अनेक जाहिरातींमध्ये काम केले. अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर अमृता चित्रपटाकडे वळली. तिने तुम बिन या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिने मिनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकन देखील मिळाले होते. या चित्रपटानंतर ती पाच वर्षांनी विवाह या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाल्यामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण तिने चित्रपटांमध्ये काम न करता अभ्यासाकडे लक्ष देण्याचे ठरवले आणि तिने अभिनयक्षेत्रातून काही वर्षांचा ब्रेक घेतला. तिने मुंबई युनिव्हर्सिटीमधून वाणिज्य शाळेतून पदवी घेतली. त्यानंतर बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर ड्रिग्री घेतली.
![amrita prakash]()
अमृता प्रकाश काही महिन्यांपूर्वी महाकाली या मालिकेत झळकली होती. ती अभिनय क्षेत्रात खूपच कमी काम करत असली तरी तिच्या सोशल नेटवर्किंगच्या अकाऊंटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो आवर्जून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या अकाऊंटवर अनेक फॉलोव्हर्स आहेत.
Also Read : अमृता रावने या अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला दिला होता नकार!