अमिताभचा ‘ईव’ लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 06:08 IST2016-03-07T13:08:16+5:302016-03-07T06:08:16+5:30
आजारपण दूर सारून बिग बी अमिताभ बच्चन आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी नव्या दमाने सज्ज झाले आहेत. शूजीत सरकार निर्मित ‘ईव’ ...

अमिताभचा ‘ईव’ लूक
आ ारपण दूर सारून बिग बी अमिताभ बच्चन आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी नव्या दमाने सज्ज झाले आहेत. शूजीत सरकार निर्मित ‘ईव’ या चित्रपटात अमिताभ दिसणार आहेत. सोमवारी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. राष्ट्रीय पुरस्कारविजेत बांगला चित्रपट दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. हा चौधरी यांचा पहिला बॉलिवूडपट असेल. अमिताभ यांनी स्वत: टिष्ट्वटरवरून याची माहिती दिली. दिल्लीत आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या चित्रपटासाठी दाढी वाढवलेली आहे...असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे. या टिष्ट्वटसोबत एक ताजा फोटोही त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात ते पांढरा शर्ट व ग्रे स्वेटरमध्ये दिसत आहे. यात फे्रंच कट ऐवजी ते पूर्ण दाढीत दिसत आहे. हा माझा नवा लुक़ चित्रपटातील माझ्या भूमिकेची ती गरज आहे. गत अनेक वर्षांपासून अशा लूकमध्ये दिसलेलो नाही, असे त्यांनी या फोटोखाली लिहिले आहे.