काहीच न बोलता अमिताभ यांनी घेतली पाकिस्तानची मजा, पाहा विराटचं कनेक्शन असलेला 'तो' व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:31 IST2025-05-16T12:30:33+5:302025-05-16T12:31:15+5:30
पाकिस्तान आणि विराट कोहलीसंदर्भातील विनोदावर अमिताभ बच्चन यांचं ट्विट.

काहीच न बोलता अमिताभ यांनी घेतली पाकिस्तानची मजा, पाहा विराटचं कनेक्शन असलेला 'तो' व्हिडीओ
Amitabh Bachhan Tweet: अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विशेषतः ते X (पुर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर नियमित अपडेट्स देत असतात. पण, मागील काही दिवस ते मौन बाळगून होते. भारत-पाकिस्तान बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावरही अमिताभ बच्चन काहीच बोलले नव्हते. आमिताभ हे ट्वीटमध्ये फक्त अनुक्रमांक पोस्ट करत होते. अखेर १९ दिवसांनंतर ११ मे रोजी अमिताभ यांनी ट्विटरवर पोस्ट करुन मौन सोडलंं होतं. त्यानंतर आता सतत पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे ट्विट करताना दिसून आलेत. आता अमिताभ यांनी केलेलं एक लेटेस्ट ट्विट चर्चेत आलं आहे.
अमिताभ यांनी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तान यांच्यावरील विनोदावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका महिला पत्रकाराचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये महिला पत्रकार ही पाकिस्तानवर जोरदार टीका करताना दिसतेय. ती म्हणते, "भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असताना पाकिस्तानसाठी एकमेव चांगली बातमी म्हणजे विराट कोहली निवृत्त झाला". या व्हिडीओवर अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये हसतानाचे एमोजी शेअर केले आहेत. काहीच न बोलता अमिताभ यांनी पाकिस्तानची घेतलली फिरकी चर्चेचा विषय ठरली आहे.
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 14, 2025
पण, विशेष म्हणजे जेव्हा अमिताभ यांनी हा व्हिडीओ शेअर केला. तेव्हा ते त्या ट्विटला अनुक्रमांक द्यायला विसरले आणि नेटकऱ्यांनी लगेचच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका युजरनं विचारलं, "तुमचं अकाउंट हॅक झालंय का?" तर एकानं लिहिलं, "जेव्हा एखादी व्यक्ती खूप एन्जॉय करत असतो, तेव्हा ती नंबर लिहायला विसरते". आपण अनुक्रमांक द्यायला विसरलो, हे लक्षात येताच आमिताभ यांनी पुन्हा एक ट्विट करत अनुक्रमांक दिला.
T 5379 - 👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 14, 2025
अमिताभ बच्चन यांचं वय हे ८२ वर्ष आहे. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ हे सुरुवातीच्या काळात जितके सक्रिय होते, आजही तितकेच सक्रिय आहेत. २०२४ मध्ये अमिताभ यांचा 'कल्की २८९८ एडी' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातील बिग बींनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका चांगलीच गाजली. अमिताभ यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर ते लवकरच 'सेक्शन ८४' च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.