Amitabh Bachchan : बिग बींची Rolls Royce चक्क पोलिस ठाण्यात; दिग्दर्शकाकडुन मिळाली होती गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:14 IST2022-12-05T12:28:03+5:302022-12-05T13:14:10+5:30
एखाद्याची Rolls Royce रोल्स रॉयस सारखी इतकी महागडी कार पोलिस स्टेशनमध्ये धुळ खात पडेल का?

Amitabh Bachchan : बिग बींची Rolls Royce चक्क पोलिस ठाण्यात; दिग्दर्शकाकडुन मिळाली होती गिफ्ट
एखाद्याची Rolls Royce रोल्स रॉयस सारखी इतकी महागडी कार पोलिस स्टेशनमध्ये धुळ खात पडेल का? तर हो, एका लोकप्रिय व्यक्तीची रोल्स रॉयस गेल्या काही वर्षांपासून पोलिस स्टेशनमध्ये धुळ खात पडली आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणा नसून बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन आहेत. यामागे नेमके कारण काय बघुया
रोल्स रॉयसमागे नेमकी कहाणी काय?
प्रसिद्ध दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी एकलव्य चित्रपटावेळी अमिताभ यांना रोल्स रॉयस गिफ्ट दिली होती. यानंतर २०१९ मध्ये बिग बींनी ही कार धन्नासेठ या व्यक्तीला विकली. १४ कोटींचा हा व्यवहार होता.
कार पोलिस स्टेशनमध्ये का गेली ?
धन्नासेठ यांनी ती कार विकत घेतल्यानंतर कागदोपत्री ती कार स्वत:च्या नावे न करता अमिताभ यांच्याच नावे ठेवली. हे कायद्याचे उल्लंघन होते. त्यामुळे ही कार पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांना कारचा पत्ता कसा लागला ?
धन्नासेठ यांच्याकडे ट्रॅफिक हवालदाराने गाडीची कागदपत्रे मागितली. त्यात त्यांना मालक म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव दिसले. हे कायद्याचे उल्लंघन असल्याने पोलिसांनी गाडी उचलुन नेली. तेव्हापासून ही गाडी पोलिस ठाण्यातच धुळ खात पडली आहे.