अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूरला लिहिलं खास पत्र, म्हणाले "प्रिय रणबीर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:26 IST2025-03-03T17:26:08+5:302025-03-03T17:26:23+5:30
बिग बी यांनी स्वत:च्या हाताने हे पत्र लिहिले आहे.

अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूरला लिहिलं खास पत्र, म्हणाले "प्रिय रणबीर..."
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी केवळ अभिनयच करत नाही. त्यांचे काही ना काही व्यवसायही सुरू असतात. अनेकांनी स्मार्टपणे स्वत:च्या आवडीचे व्यवसाय थाटले आहेत. शूटिंगच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढत त्या स्वत:चा 'कारोबार' व्यवस्थित सांभाळत असतात. कुणी कपड्यांचा ब्रॅन्ड लॉन्च केला आहेत, तर कुणी स्वत:चा कॅफे सुरू केलाय. स्वत:चा छंद जोपासत अभिनेत्यांनी उद्योगक्षेत्रात पाऊल टाकलं आहे. अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत हे कलाकार स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच प्रकारे रणबीर कपूरनं नवा व्यवसाय सुरू केलाय आहे. रणबीरच्या नव्या व्यवसायाला बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्यात.
रणबीर कपूरनं गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईन डेला एआरकेएस (ARKS) नावाचा ब्रँड लाँच केला आहे. यानंतर त्यानं अमिताभ बच्चन यांना एक स्नीकर्सची जोडी भेट म्हणून दिली. यावर आभार मानत अमिताभ यांनी रणबीरला पत्र लिहून शुभेच्छा दिल्यात. खास म्हणजे त्यांनी हे पत्र स्वत:च्या अक्षरात लिहून पाठवलं आहे.
रणवीर कपूरच्या एआरकेएस ब्रँडच्या इन्स्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन यांनी लिहिलेले पत्र शेअर (Amitabh Bachchan letter to Ranbir Kapoor) करण्यात आलेले आहे. अमिताभ यांनी लिहिलं, ''प्रिय रणबीर, तू दिलेल्या गिफ्टसाठी मी कृतज्ञ आहे. एआरकेचे स्नीकर मी घालून बघितले. ते खूप छान आणि कम्फर्टेबलआहेत. तुला या प्रोजक्टेसाठी खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम'', या शब्दात त्यांनी रणबीरला आशिवार्द दिले.
अमिताभ आणि रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते बिग बी हे केबीसीचं होस्टिंग करताना पाहायला मिळत आहे. नुकतंच केबीसीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं ते एका खास सेगमेंटचे आयोजन करत आहेत. तर रणबीर हा लवकरच 'रामायण' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात साऊथ अभिनेत्री साई पल्लवीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच तो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो पत्नी आलिया भट आणि विकी कौशलसोबत झळकणार आहेत. हा चित्रपट २०२५ च्या ख्रिसमसला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.