अमिताभ बच्चन यांनी पाहिला नातू अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' सिनेमा; प्रतिक्रिया देत म्हणाले- "खोटा आव न आणता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:39 IST2025-12-23T12:34:43+5:302025-12-23T12:39:02+5:30
अमिताभ बच्चन यांनी नातू अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहून बिग बींनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे

अमिताभ बच्चन यांनी पाहिला नातू अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' सिनेमा; प्रतिक्रिया देत म्हणाले- "खोटा आव न आणता..."
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच आपला नातू अगस्त्य नंदा याचा आगामी चित्रपट 'इक्कीस' (Ikkis) पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर बिग बी अत्यंत भावुक झाले असून त्यांनी सोशल मीडिया आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू शेअर केला आहे. अगस्त्यचा अभिनय पाहून एक आजोबा म्हणून त्यांचे डोळे अभिमानाने भरून आले आहेत.
अमिताभ बच्चन काय म्हणाले?
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, अगस्त्यला मोठ्या पडद्यावर पाहताना त्याच्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या सर्व आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. अगस्त्यचा अभिनय अत्यंत प्रगल्भ आणि भूमिकेला साजेसा आहे. त्याने अरुण खेत्रपाल यांचे पात्र कोणत्याही खोटा आव न आणता अत्यंत प्रामाणिकपणे साकारले आहे. त्यामुळेच हे पात्र थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडते. जेव्हा अगस्त्य फ्रेममध्ये असतो, तेव्हा प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावरच खिळून राहतात."
या चित्रपटातून अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. धर्मेंद्र यांची अशी इच्छा होती की, हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील लोकांनी पाहावा, जेणेकरून युद्धामागील भावनिक पैलू समोर येतील. नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेला 'इक्कीस' हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नातवाच्या अभिनय अमिताभ बच्चन यांचे डोळे अभिमानाने आणि आनंदाने भरुन आले असून चाहत्यांमध्ये आता या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
'इक्कीस' हा चित्रपट भारतीय सैन्यातील अधिकारी सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित एक 'बायोग्राफिकल वॉर ड्रामा' आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शौर्यासाठी अरुण खेत्रपाल यांना मरणोत्तर 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले होते. ते भारताचे सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते आहेत. त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत अगस्त्य नंदा झळकणार आहे.