"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:40 IST2025-10-20T16:39:15+5:302025-10-20T16:40:44+5:30
अमिताभ यांनी पहाटे ५ वाजता एक ट्विट शेअर केलं. जे चर्चेत आलं आहे.

"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. ते कायम चर्चेत असतात. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते सक्रीय आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाचंही तितकंच आकर्षण आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते व्यक्त होत असतात. अशातच त्यांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.
अमिताभ यांनी पहाटे ५ वाजता एक ट्विट शेअर केलं. ज्यात त्यांनी लिहलं, "या जगात दोन प्रकारचे लोक असतात. अशा दोन्ही लोकांपासून दूर राहावे". त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरे ट्विट केले आणि या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते "बनावट! बस्स". हे दोन ट्विट पाहून नेटकरी पुन्हा गोंधळले. अनेकांनी बिग बींना थेट विचारले आहे की त्यांना नेमके कोणत्या दोन प्रकारच्या लोकांपासून दूर राहण्याचा इशारा द्यायचा आहे.
T 5534 - इस दुनिया में दो तरह के लोग होते हैं - दोनों से दूर रहना चाहिए
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 17, 2025
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटचे 'Kalki 2898 AD' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवा सध्या ते 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोच्या १७ व्या सीझनचं होस्टिंगही करतआहेत. कित्येक वर्षांपासून ते या शोचा भाग आहेत. एकेकाळी अमिताभ बच्चन दिवाळखोर व्हायला आले होते. तेव्हा याच शोने त्यांन तारलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, कौन बनेगा करोडपती १७ साठी बिग बी दर एपिसोडसाठी कोटींमध्ये मानधन घेतात.