ओळखा पाहू अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोतील या चिमुरडीला, आता करतेय बॉलिवूडवर राज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 18:00 IST2019-05-17T18:00:00+5:302019-05-17T18:00:00+5:30
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते नेहमी ब्लॉग, इंस्टा व ट्विटरवर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात.

ओळखा पाहू अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोतील या चिमुरडीला, आता करतेय बॉलिवूडवर राज
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते नेहमी ब्लॉग, इंस्टा व ट्विटरवर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. तसेच कधी कधी ते या कारणामुळे चर्चेतही येतात. नुकतीच त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे जो ब्लॅक अँड व्हाईट आहे. फोटो पाहिल्यानंतर समजते की हा फोटो सिनेमाच्या चित्रीकरणावेळीचा आहे. या फोटोत अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला समजली नसती जर अमिताभ बच्चन यांनी सांगितली नसती.
अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो १९८३मध्ये प्रदर्शित झालेला पुकार चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे. या फोटोत अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक मुलगी आणि नर्स पहायला मिळते आहे. या फोटोत अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला पटकन समजणार आहे. या फोटोत जी छोटी मुलगी दिसत आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आहे.
अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करीत कॅप्शन लिहिले की, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून करीना कपूर आहे. फोटो शेअर करत बिग बींनी लिहिले, ओळखा ही कोण आहे? ही करीना कपूर आहे. हा फोटो जेव्हा गोव्यात पुकारमध्ये शूटिंग चालू होते त्यावेळचा आहे. त्यावेळी करीना तिचे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत सेटवर आली होती. त्यावेळी तिच्या पायाला जखम झाली होती आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या फोटोतील ही करीना कपूर आहे, हे ओळखता येत नाही आहे.