"लोक बोलतात, शिवीगाळ करतात, पण..." असं का म्हणाले अमिताभ बच्चन, जाणून घ्या पोस्ट मागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 10:01 IST2025-09-21T10:01:23+5:302025-09-21T10:01:38+5:30
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे.

"लोक बोलतात, शिवीगाळ करतात, पण..." असं का म्हणाले अमिताभ बच्चन, जाणून घ्या पोस्ट मागचं सत्य
बॉलिवूडमधील महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग मोठा आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाचंही तितकंच आकर्षण आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते व्यक्त होत असतात. अलीकडेच त्यांनी प्रेम या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, "लोक बोलतात, लोक नापसंत करतात, लोक शिवीगाळ करतात. पण शेवटी, प्रेम नेहमीच जिंकते. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो", असं म्हटलं. यासोबत त्यांनी हार्ट एमोजीही शेअर केले.
नेटिझन्सनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. एका युजरनं लिहिले, "तुम्ही बरोबर आहात, साहेब. या जगात, प्रेम नेहमीच जिंकते. तुमचे शब्द आपल्याला द्वेषाच्या पलीकडे जाऊन आपल्यातील बंध जपण्याची आठवण करून देतात". पण, काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टचा संबंध अभिनेत्री रेखा यांच्याशी जोडला.
T 5507 - People talk, people dislike , people abuse .. but at the end love prevails ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 20, 2025
I love you all ❤️
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या 'Kalki 2898 AD' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोचं ते सध्या सुत्रसंचालन करत आहेत.