तो सिगारेटने पेटवत होता रॉकेट, पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 12:59 IST2019-10-28T12:58:29+5:302019-10-28T12:59:16+5:30
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

तो सिगारेटने पेटवत होता रॉकेट, पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या सिगारेटने रॉकेट पेटवताना दिसत आहे. जराही न घाबरता हा इसम सिगारेटने एका पाठोपाठ एक असे अनेक रॉकेट पेटवताना दिसतोय.
हा व्हिडीओ पाहून कुणीही थक्क होईल. अमिताभ बच्चन यांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केला आहे. केवळ इतकेच नाही तर ‘हे भगवान, न करो एसे भैया, असेही या व्हिडीओसोबत लिहिले.
हे भगवान । न करो एसे भैया । https://t.co/yF0q5Kw2mv
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 27, 2019
त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिझी आहेत. येत्या काळात चेहरे, झुंड, ब्रह्मास्त्र आणि गुलाबो सिताबो या चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत.
T 3529 - So many hands and fingers to replenish the ages of time .. pic.twitter.com/7Tx1dDTIdI
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 25, 2019
महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गत १६ ऑक्टोबरला पहाटे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना ताबडतोब नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात नियमित आरोग्य तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले गेले होते.