विराट आणि रोहित नाही तर 'हा' आहे अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपटू, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:56 IST2025-10-29T10:47:30+5:302025-10-29T10:56:41+5:30
अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपटू कोण? 'त्याचं' कौतुक करत म्हणाले...

विराट आणि रोहित नाही तर 'हा' आहे अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपटू, म्हणाले...
Amitabh Bachchan Praised His Favourite Cricketer: बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन वयाच्या ८३व्या वर्षीदेखील उत्साहानं काम करताना दिसतात. सिनेमात तितक्याच ताकदीच्या भूमिका साकारताना दिसतात. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती १७' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. नुकत्याच एका एपिसोडमध्ये, बिग बींनी त्याच्या आवडत्या भारतीय क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला भारतीय क्रिकेटच्या नेतृत्वाशी संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. "मे २०२५ मध्ये भारतीय पुरुषांच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता?" या प्रश्नावर, क्रिकेट न पाहणाऱ्या त्या स्पर्धकाने उत्तर माहित नसल्याची कबुली दिली. लाइफलाइनचा वापर करून स्पर्धकाने "शुभमन गिल" हे योग्य उत्तर दिले. यावेळी बिग बींनी शुभमन गिलचं कौतुक केलं.
शुभमन गिलचे कौतुक करताना अमिताभ बच्चन यांनी त्याचे वय आणि उत्तम खेळाची विशेष प्रशंसा केली. अमिताभ बच्चन म्हणाले, "शुभमन गिल खूप तरुण आहे आणि तो उत्तम खेळतो. तो एक प्रेरणास्थान बनला आहे". बिग बींनी पुढे म्हटले की, "तो इतका चांगला खेळतो की त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय". भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या अमिताभ बच्चन यांच्याकडून राष्ट्रीय टेलिव्हिजनवर अशा प्रकारे कौतुक ऐकून शुभमन गिलचे चाहते खुश झाले आहेत.