Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 11:14 IST2024-03-14T11:13:57+5:302024-03-14T11:14:26+5:30

अमिताभ बच्चन यांची अलीकडेच त्यांच्या डुप्लिकेटशी भेट झाली. त्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Amitabh Bachchan meets his doppelganger Shashikant pedwal video viral | Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

कलाकारांना त्यांच्या फॅन्सचे अनेक अनुभव सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही फॅन्स तर आपल्या लाडक्या कलाकाराचं दुसरं आयुष्यच जगत असतात. असाच एक फॅन म्हणजे शशिकांत पेडवाल. शशिकांत यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. अमिताभ बच्चन यांचे फॅन असणारे शशिकांत जणु काही दुसरे बिग बीच. अलीकडेच शशिकांत यांनी अमिताभ यांच्यासोबत भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

शशिकांत आणि अमिताभ बच्चन यांची नुकतीच एका शूटिंग सेटवर एक भेट झाली. हुबेहूब स्वतःसारखा दिसणारा माणूस समोर उभा राहताच अमिताभ सुद्धा काही क्षण चकीत झाले. शशिकांत अमिताभ यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी बिग बींचा आशिर्वाद घेतला. अमिताभ यांनीही शशिकांतचं कौतुक केलं. या भेटीचा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 

शशिकांत पेडवाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ यांच्या डुप्लिकेटने कृतज्ञता व्यक्त करत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिले की, "गुरुदेव आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज 2 मिलीयन फॉलोअर्सपर्यंत पोहोचलो आहे." शशिकांत यांच्या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. शशिकांत गेली अनेक वर्ष अमिताभ यांचे डुप्लिकेट म्हणून चर्चेत आहेत.

Web Title: Amitabh Bachchan meets his doppelganger Shashikant pedwal video viral