अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत, प्रकृती ठीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 08:32 IST2022-10-24T08:31:19+5:302022-10-24T08:32:04+5:30

अमिताभ यांची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Amitabh Bachchan leg injury, health is fine | अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत, प्रकृती ठीक

अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत, प्रकृती ठीक

मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांनी स्वतः ब्लॉगवर ही माहिती शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, धातूच्या धारदार तुकड्याने डाव्या पायाची नस कापली गेल्याने रक्तस्राव सुरू झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले व पायावर टाके टाकण्यात आले.

अमिताभ यांची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पायावर अधिक ताण न देण्याचा सल्लाही त्यांना
देण्यात आला आहे. अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील फोटो शनिवारी पोस्ट केले होते. यात त्यांच्या डाव्या पायाला पट्टी बांधलेली दिसत आहे.

बिग बी यांच्या पायाची नस कापल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. मात्र, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कळताच सर्वांना हायसे वाटले.
 

Web Title: Amitabh Bachchan leg injury, health is fine