किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:37 PM2023-11-07T17:37:54+5:302023-11-07T17:38:38+5:30

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा

amitabh-bachchan-keep-his-shoes-under-the-pillow-know-the-interesting-story | किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण

किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूडचा मेगास्टार म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh bachchan). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अमिताभ यांनी केवळ देशातच नाही तर विदेशातही लोकप्रियता मिळवली. जवळपास ५ दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से आहेत. यामध्येच सध्या त्याचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. एकेकाळी बिग बी रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या उशाखाली चप्पल ठेवायचे.

अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेले बिग बी छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करताना पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी आतापर्यंत त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से शेअर केले आहेत. यामध्येच त्यांनी कौन बनेगा करोडपती १५ च्या मंचावर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्येच बोलत असताना ते उशाशी चप्पल घेऊन झोपायचे असं त्यांनी सांगितलं.

"मला शाळेत असताना क्रिकेट क्लबमध्ये जायचं होतं. पण, कधी ते शक्य झालं नाही. त्यावेळी माझ्या आईकडे २ रुपये सुद्धा नव्हते. त्यामुळे मला त्या क्लबमध्ये सहभागी होता आलं नाही. पण, मी कधीच आई-वडिलांकडे कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. मात्र, जेव्हा कधी ते मला नवीन चप्पल खरेदी करुन द्यायचे. त्यावेळी ती चप्पल मी माझ्या उशीखाली घेऊन झोपायचो", असं अमिताभ बच्चन म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "माझ्या आई-वडिलांनी मला दिलेली ती मौल्यवान वस्तू होती. त्यामुळे मी तसं करायचो". दरम्यान, बराच स्ट्रगल केल्यानंतर अमिताभ यांनी इंडस्ट्रीत यश मिळवलं आहे. 'जंजीर', 'मोहबब्तें', 'सत्ते पे सत्ता' यांसारखे त्यांचे असंख्य सिनेमा बॉलिवूडमध्ये गाजले आहेत.
 

Web Title: amitabh-bachchan-keep-his-shoes-under-the-pillow-know-the-interesting-story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.