'केबीसी १७'मध्ये विचारला १२ लाख ५० हजारांचा हा कठीण प्रश्न; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:38 IST2025-08-13T15:35:41+5:302025-08-13T15:38:43+5:30
'केबीसी १७'मध्ये १२ लाख ५० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने स्पर्धकाला अवघे ५ लाख रुपये घेऊन घरी जावं लागलं. काय होता तो प्रश्न?

'केबीसी १७'मध्ये विचारला १२ लाख ५० हजारांचा हा कठीण प्रश्न; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?
‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या १७व्या सीझन नुकताच सुरु झालाय. अमिताभ बच्चन त्यांच्या खास शैलीत या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत. 'केबीसी १७'च्या दुसऱ्या भागात एक खास प्रसंग घडला. इन्कम टॅक्स विभागात उप-आयुक्त म्हणून काम करणारे आशुतोष नावाचे स्पर्धक हॉट सीटवर बसले होते. त्यांनी उत्तम खेळ करत ११ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आणि थेट १२व्या प्रश्नापर्यंत पोहोचले. हा प्रश्न १२ लाख ५० हजार रुपयांचा होता. पण या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं. काय होता प्रश्न?
हा होता १२ लाखांचा प्रश्न
'केबीसी १७'मध्ये हॉटसीटवर बसलेल्या अमिताभ यांनी आशुतोष यांना १२ लाख ५० हजारांचा प्रश्न विचारला. हा प्रश्न होता की, "मार्क झुकरबर्ग आणि सर्गेई ब्रिनसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन केलेला 'ऑस्कर ऑफ सायन्स' हे कोणत्या पुरस्काराचं दुसरं नाव आहे? यासाठी पर्याय होते, A) एडिसन पुरस्कार, B) ब्रेकथ्रू पुरस्कार, C) मिलेनियम पुरस्कार, D) यूरेका पुरस्कार. आशुतोष यांना या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. त्यांनी सर्व लाईफलाईन आधीच वापरल्या होत्या. चुकीचं उत्तर दिल्याने त्यांना मोठा फटका बसला.
हे होतं योग्य उत्तर
आशुतोष यांनी चुकीचं उत्तर दिल्याने त्यांना १२ लाख ५० हजार रुपयांच्या ऐवजी फक्त ५ लाख रुपये घेऊन घरी जावे लागले. यामुळे त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा फटका बसला. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं B) ब्रेकथ्रू पुरस्कार. आशुतोष यांनी उत्तम संयम आणि बुद्धिमत्ता दाखवली होती. मात्र, एका चुकीच्या उत्तरामुळे त्यांना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाली. अमिताभ बच्चन यांनीही आशुतोष यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, KBCमध्ये केवळ ज्ञानच नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही महत्त्वाचे असते. हा खेळ फक्त पैशांचा नसून अनुभव आणि शिकवणींचाही आहे.