​अमिताभ बच्चन यांनी दिला भुतकाळातील आठवणींना उजाळा... सांगितले या कारणांनी मला बॉलिवूडमध्ये मिळाला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 11:40 IST2017-12-15T06:10:10+5:302017-12-15T11:40:10+5:30

अमिताभ बच्चन हे आज बॉलिवूडमधील सगळ्यात मोठे नाव आहे. त्यांना सदी का महानायक असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ...

Amitabh Bachchan has given me the memories of the ghost ... | ​अमिताभ बच्चन यांनी दिला भुतकाळातील आठवणींना उजाळा... सांगितले या कारणांनी मला बॉलिवूडमध्ये मिळाला होता नकार

​अमिताभ बच्चन यांनी दिला भुतकाळातील आठवणींना उजाळा... सांगितले या कारणांनी मला बॉलिवूडमध्ये मिळाला होता नकार

िताभ बच्चन हे आज बॉलिवूडमधील सगळ्यात मोठे नाव आहे. त्यांना सदी का महानायक असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आजवर खूप चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या भूमिकांचे कौतुक देखील झाले आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. अमिताभ हे बॉलिवूडमधील सुपरस्टार असले तरी त्यांना सुरुवातीच्या काळात अनेक नकार पचवावे लागले होते. त्यांनी याविषयी अनेक वेळा त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 
अमिताभ बच्चन त्यांच्या करियरच्या सुरुवातीला ऑल इंडिया रेडिओमध्ये ऑडिशनला गेले होते. पण तिथे त्यांच्या आवाजामुळे त्यांची निवड झाली नाही. त्यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा खूप जुना फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत त्यांना सुरुवातीच्या काळात कशाप्रकारे रिजेक्शनचा सामना करावा लागला हे सांगितले आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन देखील लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की, हाच तो फोटो आहे जो मी बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळवण्यासाठी पाठवला होता. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको... पण हा फोटो पाहून मला रिजेक्ट करण्यात आले होते. 

amitabh bachchan mother teji bachchan

अमिताभ बच्चन यांनी या फोटोसोबत आणखी एक गोष्ट त्यांच्या फॅन्सना सांगितली आहे. अमिताभ बच्चन यांच्या फॅशन सेन्सचे कौतुक नेहमीच लोक करतात. अमिताभ नेहमीच आपल्याला स्टायलिश अंदाजात लोकांना पाहायला मिळतात. ते फॅशनबाबत कोणाकडून शिकले हे देखील त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे. त्यांनी त्यांची आई तेजी बच्चन यांच्यासोबत एक फोटो शेअर करून त्यासोबत म्हटले आहे की, या फोटोत मी आणि माझी आई आहे... हा पन्नाशीच्या दशकातील फोटो आहे. माझ्या आईकडून मी फॅशन आणि स्टाइलबद्दल शिकलो. हा पहिला सुट आणि टाय आहे जो माझ्या आईने मला घालायला लावला होता. हा सूट आणि टाय मी इलाहबादच्या एका कार्यक्रमासाठी घातला होता. आईने फॅशबद्दल शिकवल्यानंतर आजही फॅशनबद्दलची समज मला चांगलीच आहे. 

Also Read : अमिताभ बच्चन यांच्या या गोष्टीमुळे दुखावले गेले धर्मेंद्र

Web Title: Amitabh Bachchan has given me the memories of the ghost ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.