'द आर्चीज'मुळे झालेल्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाने सोडलं मौन, अगस्त्य म्हणाला, " काहींना सिनेमा आवडला नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 05:07 PM2024-01-13T17:07:04+5:302024-01-13T17:08:15+5:30

"माझा पहिलाच प्रयत्न पण...", 'द आर्चीज' सिनेमाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला अगस्त्य नंदा

amitabh bachchan grandson agastya nanda break silence on trolling over the archies movie | 'द आर्चीज'मुळे झालेल्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाने सोडलं मौन, अगस्त्य म्हणाला, " काहींना सिनेमा आवडला नाही, पण..."

'द आर्चीज'मुळे झालेल्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाने सोडलं मौन, अगस्त्य म्हणाला, " काहींना सिनेमा आवडला नाही, पण..."

स्टारकिड्सचा 'द आर्चीज' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने झोया अख्तरच्या या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, पहिल्याच सिनेमामुळे अगस्त्यला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'द आर्चीज'मधील अगस्त्यच्या अभिनयाची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. आता पहिल्यांदाच यावर अगस्त्यने भाष्य केलं आहे. 

अगस्त्यने फिल्म कंपेनियनला मुलाखतीत 'द आर्चीज'मुळे झालेल्या ट्रोलिंगवर मौन सोडलं. अशा प्रकारच्या नकारात्मक प्रतिक्रियांसाठी तयार नसल्याचं अगस्त्य म्हणाला. "मला कळत नव्हतं याचा सामना मी कसा करू. जेव्हा तुम्ही या क्षेत्रासाठी पूर्णपणे तयार नसता. तेव्हा अनेक लोकांची अनेक मतं असतात. पण, स्वत:चं मत असणं, ही चांगली गोष्ट आहे. पण, हे काय होतंय ते मला माहीत नव्हतं. काहींना हा चित्रपट आवडला नाही. तर काहींच्या हा सिनेमा पसंतीस उतरला," असं अगस्त्य म्हणाला.

पुढे तो म्हणाला, "सिनेमाला हवं तसं यश मिळालं नाही. पण, ठीक आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. पण, मी अजून मेहनत करेन. आणि पुन्हा प्रयत्न करेन. जर दुसऱ्या प्रयत्नात यश आलं नाही तर तिसऱ्यांदा करेन. पण, या गोष्टी कळण्यासाठी मला वेळ लागला." अगस्त्य 'इक्कीस' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९७१ मध्ये झालेल्या युद्धातील योद्धा अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

दरम्यान, अगस्त्यबरोबरच 'द आर्चीज' सिनेमातून सुहाना खान, खुशी कपूर यांनीही सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ४० कोटींचं बजेट असलेला स्टारकिड्सचा हा सिनेमा २२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. पण, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. 

Web Title: amitabh bachchan grandson agastya nanda break silence on trolling over the archies movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.