Breaking: महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 19:44 IST2019-09-24T19:36:29+5:302019-09-24T19:44:39+5:30

अमिताभ बच्चन यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. त्यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

Amitabh Bachchan to get the Dadasaheb Phalke Award | Breaking: महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Breaking: महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ठळक मुद्देप्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. अमिताभ बच्चन यांची निवड दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहेत. आपल्या जवळजवळ दोन पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहतेदेखील खूश होतील. त्यांना या पुरस्कारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.



 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बॉलिवूडवर राज्य करत असून त्यांचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. सध्या त्यांचा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत असून त्याला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जंजीर, शोले, डॉन, त्रिशुल, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. 


 

Web Title: Amitabh Bachchan to get the Dadasaheb Phalke Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.