अमिताभ बच्चन झाले सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केली आणखी एक कोट्यवधीची प्रॉपर्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 17:23 IST2021-05-28T17:22:21+5:302021-05-28T17:23:53+5:30
सवलतीचा लाभ घेत स्टॅम्प ड्युटीपोटी मोजले 62 लाख, डुप्लेक्सची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

अमिताभ बच्चन झाले सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केली आणखी एक कोट्यवधीची प्रॉपर्टी
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पाच बंगल्याचे मालक आहेत. आता अमिताभ यांनी मुंबईत आणखी एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केल्याचे कळतेय.
Zapkey.com च्या रिपोर्ट्सनुसार, अंधेरीतील 28 मजली इमारतीतील 5 हजार 184 स्क्वेअर फुटचे हे डुप्लेक्स अमिताभ यांनी डिसेंबर 2020 रोजी खरेदी केले होते. पण एप्रिल 2021 मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन केले. यासाठी स्टॅम्प ड्युटीपोटी त्यांना 62 लाख रूपये मोजावे लागलेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीमुळे स्टॅम्प ड्युटीत सवलत दिली आहे. त्याचा लाभ अमिताभ यांना मिळाला आहे. आता या डुप्लेक्सची किंंमत किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याची किंमत आहे 31 कोटी रूपये. या डुप्लेक्ससोबत अमिताभ यांना 6 कार पार्किंगची जागाही मिळाली आहे. (Amitabh Bachchan buys duplex worth rs 31 crore in Mumbai)
सनी लिओनीचे शेजारी
हे डुप्लेक्स खरेदी केल्यानंतर अमिताभ आता अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) शेजारी झाले आहेत. होय, ज्या 28 मजली इमारतीत अमिताभ यांनी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे, त्याच इमारतीत तिथेच सनी लिओनीने 16 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. दिग्दर्शक आनंद एल राय यांनीही याच इमारतीत 25.3 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
अमिताभ पाच बंगल्याचे मालक
अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबईत पाच बंगले आहे. जुहू भागात त्यांचा मोठा जलसा नावाचा मोठा बंगला आहे. अमिताभ सध्या कुटुंबासोबत याच बंगल्यात राहतात. प्रतीक्षा नावाचा त्यांचा दुसरा बंगला आहे. या बंगल्यात ते आई-वडिलांसोबत राहत. मात्र आईवडिलांच्या निधनानंतर अअमिताभ ‘जलसा’मध्ये शिफ्ट झाले होते. जनक या बंगल्यात अमिताभ यांचे कार्यालय आहे. येथे ते मीडिया व पाहुण्यांना भेटतात. याशिवाय अमिताभ यांची आणखी एक प्रॉपर्टी आहे. ती त्यांनी एका मल्टिनॅशनल बँकेला भाड्याने दिली आहे. यातील काही भाग बच्चन कुटुंब पार्टीसाठी वापरते. 2014 साली अमिताभ यांनी ‘जलसा’च्या अगदी मागचा बंगला 60 कोटींना खरेदी केला होता. येथे त्यांची नात आराध्या हिला खेळण्यासाठी मोठे गार्डन व मोठी लिव्हिंग रूम आहे.