पहाटे ५:३० वाजेपर्यंत काम केल्यानंतर बिग बींची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट, माफी मागत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:00 IST2025-12-12T10:54:00+5:302025-12-12T11:00:26+5:30
अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची का मागितली माफी?

पहाटे ५:३० वाजेपर्यंत काम केल्यानंतर बिग बींची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट, माफी मागत म्हणाले...
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. ते कायम चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचं वय आता ८३ असूनही ते अजूनही इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जगभरातील चाहत्यांसोबत ते जोडले गेले आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी ते सोशल मीडियावर पोस्ट करतात किंवा आपल्या ब्लॉगमध्ये भरभरुन लिहतात. नुकतंच अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांनी माफी मागितली आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये खुलासा केला की ते सकाळी ५:३० वाजेपर्यंत काम करत होते. त्यामुळे ते ब्लॉग लिहण्यास आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला विसरले. म्हणून त्यांनी चाहत्यांची माफी मागितली आणि पश्चात्ताप व्यक्त केला अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, "मी सकाळी ५:३० वाजेपर्यंत काम केले… आणि मला आठवलेच नाही की माझ्याकडे ब्लॉगचे काम बाकी आहे. त्याबद्दल माफ करा".
एका दुसऱ्या पोस्टमध्ये बिग बी यांनी सांगितले की काही दिवसांपासून काही भावना त्यांच्या मनात रेंगाळत आहेत. त्यांनी लिहिले, "मन आणि शरीर कामावर लक्ष केंद्रित करू देत नाहीये". या भावनिक स्थितीमागे त्यांचे जवळचे मित्र आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे दु:ख असल्याचे त्यांनी सांगितलं.
T 5591(i) - pic.twitter.com/Ja9eY1VFph
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 10, 2025
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूरसोबत 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये ते 'गुरु वशिष्ठ' किंवा अन्य महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.