'तू माझा उत्तराधिकारी आहेस आणि...'; बिग बींनी अभिषेकला दिले घराचे अधिकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:01 IST2022-03-24T13:00:43+5:302022-03-24T13:01:47+5:30

Amitabh bachchan: बिग बींना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात संपत्तीचा जास्त वाटा जाणार ही चर्चा होते.

amitabh bachchan announced abhishek bachchan as his heir after seeing dasvi trailer | 'तू माझा उत्तराधिकारी आहेस आणि...'; बिग बींनी अभिषेकला दिले घराचे अधिकार?

'तू माझा उत्तराधिकारी आहेस आणि...'; बिग बींनी अभिषेकला दिले घराचे अधिकार?

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या यशस्वी कारकिर्दीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. गेल्या कित्येक दशकांपासून ते सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विशेष म्हणजे बिग बी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही सातत्याने चर्चेत येत असतात. यात खासकरुन त्यांच्या संपत्ती आणि लक्झरी लाइफस्टाइलविषयी चर्चा होत असते. आजवरच्या कारकिर्दीत बिग बींनी अमाप संपत्ती कमावली आहे. त्यामुळे या संपत्तीचा खरा वारसदार कोण?  असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. यात बिग बींना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात संपत्तीचा जास्त वाटा जाणार ही चर्चा होते. मात्र, बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चनच आपला खरा उत्तराधिकारी असल्याचं जाहीर केलं आहे.

सध्या अभिषेक त्याच्या आगामी 'दसवी' या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चर्चांमध्येच आता तो बच्चन कुटुंबाचा उत्तराधिकारी झाल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'दसवी'चा ट्रेलर शेअर करण्यात आला असून त्यांनी अभिषेकला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं आहे.

"माझ्या मुला, फक्त मुलगा झाल्यामुळे उत्तराधिकार मिळत नाही...तर जो खरा उत्तराधिकारी आहे तो माझा मुलगा आहे", अशा हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी बिग बींनी शेअर केल्या आहेत. सोबतच "अभिषेक, तू माझा उत्तराधिकारी आहेस. आणि, एकदा बोललो तर बोललो", असंही म्हणत त्यांनी अभिषेक आपला उत्तराधिकारी असल्याची घोषणा केली आहे.


 

दरम्यान, बिग बींच्या या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी बिग बींचं कौतुक केलं आहे. तर, काही जणांनी अभिषेकचं अभिनंदनही केलं आहे. अभिषेकचा दसवी हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Web Title: amitabh bachchan announced abhishek bachchan as his heir after seeing dasvi trailer