अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी दिसणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 19:01 IST2019-03-06T19:01:35+5:302019-03-06T19:01:56+5:30
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदाच अभिनेता इमरान खान काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी दिसणार एकत्र?
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी सगळेच कलाकार धडपडत असतात. आता ही संधी बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीला मिळाली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ते दोघे लवकरच एका चित्रपटात काम करणार असल्याचे समजते आहे.
पिपींगमूनच्या वृत्तानुसार रूमी जाफरी दिग्दर्शित 'बर्फ' या आगामी सिनेमानिमित्त अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र येत आहेत. सूत्रांनुसार हा कोर्टरुम ड्रामा असल्याचे सांगण्यात येत आहे.
इमरान हाश्मीचा काही महिन्यांपूर्वी 'चीट इंडिया' चित्रपट प्रदर्शित झाला होता. भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर हा चित्रपट भाष्य करतो. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. तर अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट बदला लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात ते वकिलाची भूमिका साकारणार आहेत.
‘बदला’ या सिनेमात अमिताभ बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत. बादल गुप्ता ४० वर्षांत एकही केस हरलेला नाही. पण एक केस त्याला आव्हान देते. ही केस तापसी पन्नू लढताना दिसतेय. एकंदर काय तर या चित्रपटाच्या निमित्ताने एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पिंकनंतर अमिताभ बच्चन व तापसी पन्नू यांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.