अभिषेकच्या टीमला चीअर करताना सासऱ्यांसोबत दिसली ऐश्वर्या; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 17:33 IST2024-01-07T17:31:49+5:302024-01-07T17:33:48+5:30

बच्चन कुटुंबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Amitabh Bachchan, Aishwarya, Aaradhya cheer for Abhishek's kabaddi team see Video | अभिषेकच्या टीमला चीअर करताना सासऱ्यांसोबत दिसली ऐश्वर्या; व्हिडीओ व्हायरल

अभिषेकच्या टीमला चीअर करताना सासऱ्यांसोबत दिसली ऐश्वर्या; व्हिडीओ व्हायरल

बच्चन कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने कामय चर्चेत असते. नुकतेच मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमवर कबड्डीचा सामना झाला. जयपूर पिंक पँथर्स संघाला सपोर्ट करण्यासाठी अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासह स्टेडियममध्ये पोहोचला.  अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन हे अभिषेकसोबत स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या पिंक पँथर्सला चिअर करताना दिसले.

बच्चन कुटुंबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन, सासरे अमिताभ बच्चन आणि लेक आराध्या बच्चन यांच्यासोबत कबड्डीचा सामना पाहताना दिसून आली. जयपूर पिंक पँथर्सचा सामना यू मुंबा टीमसोबत रंगला होता. यावेळी ते खूप आनंदी दिसत होते. 

 जयपूर पिंक पँथर्स ही टीम अभिषेक बच्चन याची आहेय आराध्या बच्चनने वडिलांच्या टीमला चीअर आणि सपोर्ट केले ते पाहून सगळ्यांच्याच नजर तिच्याकडे वळल्या होत्या. बच्चन कुटुंबातील सदस्यांनी पिंक पँथर्सला प्रोत्साहित करण्यासाठी ब्लू ट्रॅकसूट घातला. शनिवारी प्रो कबड्डी लीग पीकेएल सीझन 10च्या सामन्यात पिंक पँथर्सनं 'यू मुंबा'ला 41-31नं पराभूत केलं. 

ऐश्वर्या आणि अभिषेक कायमच त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. या जोडीच्या लग्नाला जवळपास १६ वर्ष झाली असून आजही ते नेटाने संसार करत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला. बच्चन कुटुंब इंडस्ट्रीतील एकदम पॉवरफुल कुटुंब म्हणून ओळखलं जातं. 

Web Title: Amitabh Bachchan, Aishwarya, Aaradhya cheer for Abhishek's kabaddi team see Video