किशोर कुमार यांना श्रद्धांजली अमित कुमार गाण्यातून देणारा श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:01 IST2017-09-28T10:31:02+5:302017-09-28T16:01:02+5:30

आपल्या वडिलांना म्हणजे प्रख्यात पार्श्वगायक किशोर कुमार यांना आदरांजली वाहण्यासाठी गायक अमित कुमार यांनी वांद्रे येथील रंगशारदा ऑडीटोरीयम येथे ...

Amit Kumar's tribute to Kishore Kumar | किशोर कुमार यांना श्रद्धांजली अमित कुमार गाण्यातून देणारा श्रद्धांजली

किशोर कुमार यांना श्रद्धांजली अमित कुमार गाण्यातून देणारा श्रद्धांजली

ल्या वडिलांना म्हणजे प्रख्यात पार्श्वगायक किशोर कुमार यांना आदरांजली वाहण्यासाठी गायक अमित कुमार यांनी वांद्रे येथील रंगशारदा ऑडीटोरीयम येथे ‘अमित कुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’चे आयोजन केले आहे. 

कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन (सीपीएए) ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था असून गेली ४८ वर्षे ती कार्कारोग्यांच्या कल्याणाप्रती कार्यरत आहे. संस्था आपल्या रुग्णांना विनामूल्य औषधे, अन्न, अॅम्बुलन्स सेवा, कृत्रिम अवयव पुरविते आणि त्याचवेळी चाचण्यांमध्येही सहकार्य करते. अशाप्रकारे रोगाचे संपूर्ण व्यवस्थापन संस्थेद्वारे केले जाते.
 
अमित कुमार हे एक आघाडीचे गायक कलाकार आहेत. ते म्हणतात, “मी सामाजिक कामांना सहकार्य करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिलो आहे. त्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवून आणण्यावर माझा भर असतो. सीपीएएबरोबर सहकार्य करत असल्याचा मला अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे उभे राहतील त्यांचा वापर गरीब घरातील आणि कर्करोगाने ग्रस्त महिलांवरील उपचार व मदतीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा समाजाचे देणे परत करण्याचा माझा प्रयत्न असतो. संगीत हा जनजागृती करण्याचे आणि सामाजिक काम करण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे,” असेही ते म्हणाले.
 
सीपीएएच्या कार्यकारी संचालिका श्रीमती अनिता पिटर म्हणाल्या, “ब्रेस्ट आणि सर्व्हायकल हे भारतातील दोन आघाडीचे कर्करोग आहेत. या रोगांच्या उपचारांसाठी जो खर्च अपेक्षित असतो तो पाहता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे उभे राहतील त्यातून गरीब घरातील कर्करोगाने ग्रस्त महिलेवर उपचार करण्यासाठी एक कायमस्वरूपी फंड निर्माण करण्यास मदत होईल. त्यातून त्यांना आपले आयुष्य सन्मानाने जगणे शक्य होईल. अमित कुमार यांनी स्वतःला भारतीय पार्श्वसंगीत क्षेत्रातील एक आघाडीचे गायक, अबिनेता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून स्थापित केले आहे. १९९५पासून ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा करत आले आहेत. त्यांनी जगभरात कार्यक्रम केले आहेत. हिंदीबरोबरच त्यांनी बंगाली, भोजपुरी, ओडिया, असामी, मराठी आणि कोंकणी या भाषांमध्येही गायन केले आहे.” 
 
 

Web Title: Amit Kumar's tribute to Kishore Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.