/>बॉलिवूड अभिनेता आमीर खान याची पत्नी आणि चित्रपट दिग्दर्शक किरण राव ही जाम सध्या टेन्शनमध्ये आहे. याचे कारण म्हणजे, कुणीतरी तिच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडले आहे. या बनावट अकाऊंटवरून ही व्यक्ती किरणचे मित्र, कुटुंबीय व चाहत्यांशी चॅट करीत आहे. ही बाब लक्षात येताच किरणने सर्वात आधी पोलिस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सस्थित पोलिस ठाण्यातील सायबर सेलसमक्ष तिने याविरोधात एफआयआर दाखल केला. पोलिस अधिकाºयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र हे प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगत पोलिस अधिकारी याबाबत बोलायला तयार नाहीत.