आमिर खान-सनी देओलच्या सिनेमाला ९५ कोटींची ऑफर? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:20 PM2023-10-02T16:20:59+5:302023-10-03T11:59:33+5:30

लवकरच आमिर आणि सनी कोलॅबोरेशनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

amir khan sunny deol s next film got 95 crore rupees offer soon they will make announcement | आमिर खान-सनी देओलच्या सिनेमाला ९५ कोटींची ऑफर? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

आमिर खान-सनी देओलच्या सिनेमाला ९५ कोटींची ऑफर? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

googlenewsNext

अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) नुकताच 'गदर 2' (Gadar 2) हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. याद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं . आता त्याच्याकडे पुन्हा ऑफर्सची रांग लागली आहे. सनी देओल आता राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली सिनेमात काम करु शकतो. विशेष म्हणजे आमिर खान या सिनेमाची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, सिनेमाच्या एक्सक्लुझिव्हव राईट्ससाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्मने सनी आणि आमिर खानला ९५ कोटींची ऑफर दिली आहे. पुढील वर्षापर्यंत सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. मात्र अद्याप यासंदर्भात सनी देओलने कोणताही निर्णय घेतलेला नाह. १९ ऑक्टोबरला आमिर आणि सनी कोलॅबोरेशनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

सनी देओल आणि संतोषी यांनी याआधीही 'घायल', 'दामिनी' सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र आजपर्यंत आमिर खान आणि सनी देओल यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. तरी १९८५ साली आलेल्या सनी देओल स्टारर 'जबरदस्त' सिनेमात आमिर खान असिस्टंट डायरेक्टर होता. त्याचे काका नासिर हुसैन यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता.

भलेही सनी देओल आणि आमिर खानने एकत्र काम केले नसले तरी दोघांचे चित्रपट तीन वेळा बॉक्सऑफिसवर आमने सामने आले आहेत. १९९० साली 'दिल' आणि 'घायल', १९९६ साली 'राजा हिंदुस्तानी' आणि 'घातक' तर २००१ साली 'लगान' आणि 'गदर' या सिनेमांचा समावेश आहे. 

Web Title: amir khan sunny deol s next film got 95 crore rupees offer soon they will make announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.