​आमीरने दत्तक घेतली दोन दुष्काळी गावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 20:45 IST2016-04-19T15:15:33+5:302016-04-19T20:45:33+5:30

महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळाने हाहाकार माजला असताना बॉलिवूडमधील अनेक गावे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. नाना पाटेकर, अक्षयकुमार यांच्यासोबतच ...

Amir adopted two drought-villages? | ​आमीरने दत्तक घेतली दोन दुष्काळी गावे?

​आमीरने दत्तक घेतली दोन दुष्काळी गावे?

ाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळाने हाहाकार माजला असताना बॉलिवूडमधील अनेक गावे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. नाना पाटेकर, अक्षयकुमार यांच्यासोबतच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान यानेही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला आहे. आमीरने अलीकडे जलसंवर्धन अभिनयानाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील  दुष्काळग्रस्त भागाला भेट देत अनेक कुटुंबांच्या भेटी घेतल्या. दुष्काळाने पोळून निघालेल्या येथील लोकांचे हाल पाहून आमीर गहिवरला. या लोकांसाठी काहीतरी ठोस करण्याचे त्याच्या मनात आले आणि त्यामुळेच एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, आमीरने दोन गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ताल आणि कोरेगाव अशी या गावांची नावे आहेत. यापूर्वीही गुजरातमधील भीषण भूकंपानंतर आमीरने भूंकपग्रस्त कच्छमधील एक गाव दत्तक घेतले होते. पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवणे हाच दुष्काळावर मात करण्याचा एकमेव उपाय असल्याचे आमीर म्हणाला.

Web Title: Amir adopted two drought-villages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.