Pathan Controversy: "शाहरुखचा 'पठाण' एक नव्हे, दोनवेळा पाहणार", बिकीनी वादात ऋतिक रोशनच्या गर्लफ्रेंडची उडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 17:03 IST2022-12-18T17:02:25+5:302022-12-18T17:03:11+5:30
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी 'पठाण' चित्रपट सध्या वादात सापडला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्याची जोरदार चर्चा आहे.

Pathan Controversy: "शाहरुखचा 'पठाण' एक नव्हे, दोनवेळा पाहणार", बिकीनी वादात ऋतिक रोशनच्या गर्लफ्रेंडची उडी!
नवी दिल्ली-
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी 'पठाण' चित्रपट सध्या वादात सापडला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्याची जोरदार चर्चा आहे. यात दीपिकाच्या हॉटनेसचा तडका आणि शाहरुखची रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. पण त्यासोबतच दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वेगळाच वाद सध्या सुरू आहे. दीपिकानं भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यानं हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत काही संघटनांनी चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. तसंच चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. आता या वादात अभिनेता ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद हिनं उडी घेत शाहरुख आणि दीपिकाला पाठिंबा दिला आहे.
सबा आझाद हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिनं बेशरम रंग गाण्यातील शाहरुख आणि दीपिकाचा फोटो टाकला आहे. यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. यासोबत सबानं 'पठाण' सिनेमा एक नव्हे, दोनवेळा सिनेमागृहात जाऊन पाहणार असल्याचं म्हटलं आहे.
शाहरुखचा 'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच शाहरुखचे चाहते देखील सिनेमासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे शाहरुख आणि दीपिकावर 'बेशरम रंग' गाण्यातून अश्लिलता पसरवण्याचा आरोप केला जात आहे. तर काही संघटनांनी दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनवर आक्षेप घेतला आहे.