Gadar 2चे दिग्दर्शक अनिल शर्मांवर भडकली अमिषा पटेल, म्हणाली- मुलाला मोठं करण्यासाठी.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 16:27 IST2023-09-04T16:16:38+5:302023-09-04T16:27:04+5:30
60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये शानदार एंट्री केली आहे.

Gadar 2चे दिग्दर्शक अनिल शर्मांवर भडकली अमिषा पटेल, म्हणाली- मुलाला मोठं करण्यासाठी.....
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. गदर 2'च्या (Gadar 2) यशानिमित्त आयोजित सक्सेस पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यादरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. तर दुसरीकडे अमिषा आणि अनिल शर्मा एकमेकांवर आरोप करतायेत. आता अमिषाने पुन्हा एकदा अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मावर निशाणा साधला आहे.
अमिषा पटेलने दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप केला आहे की, , "मला अनिलजींसाठी खूप वाईट वाटतं, कारण त्यांनी 'गदर 2' मध्ये आपल्या मुलाला दाखवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तारा आणि सकिना यांनी सर्व प्रसिद्धी घेतली. ते त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्माला प्रमोट करण्याचा प्रयत्न करत होते, अमीषा म्हणाली की, आजच्या काळात अनेक लोक मला अनिल शर्मांवरुन प्रश्न विचारत आहेत. 'गदर २' दरम्यान आमचं संबंध चांगले नव्हते हे खरं, पण ते माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत आणि नेहमीच राहतील. जसे कुटुंबातील सर्व सदस्य कायम एकत्र राहू नाहीत. त्याचप्रमाणे आपणही एकत्र राहत नाही. आम्ही अजूनही कुटुंब आहोत. याच्या पुढे अमिषा पटेल उत्कर्ष शर्मासाठी म्हणाली की तो खूप गोड मुलगा आहे. कोणत्याही मुलाला फक्त वडिलांच्या चित्रपटात काम करायचे नसते. अनिल शर्मा यांमा या चित्रपटातून आपल्या मुलला प्रमोट करायचे होते, पण तसे होऊ शकले नाही, असा दावाही त्यांनी केला.
'गदर एक प्रेम कथा' सिनेमात तारासिंग आणि सकीनाची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली होती. त्यांची प्रेमकहाणी सिनेरसिकांना खूप भावली. 'गदर 2'मध्ये मात्र त्यांच्या प्रेमकहाणीची जादू फिकी पडली. प्रेक्षक थिएटरमध्ये तारासिंग आणि सकीनाची जोडी बघायला येतात.