Ambani pre wedding PART 2? शाहरुख, सलमानसह अनेक सेलिब्रिटी काल पुन्हा जामनगरमध्ये पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:02 IST2024-03-07T12:01:54+5:302024-03-07T12:02:43+5:30

तीन दिवसांच्या प्री वेडिंग सोहळ्यानंतर काल पुन्हा सोशल मीडियावर जामनगरचीच चर्चा

Ambani pre wedding PART 2 Many celebrities including Shah Rukh, Salman again reached Jamnagar yesterday | Ambani pre wedding PART 2? शाहरुख, सलमानसह अनेक सेलिब्रिटी काल पुन्हा जामनगरमध्ये पोहोचले

Ambani pre wedding PART 2? शाहरुख, सलमानसह अनेक सेलिब्रिटी काल पुन्हा जामनगरमध्ये पोहोचले

Ambani pre wedding : गेल्या काही दिवसांपासून अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याचीच चर्चा देशभरात सुरु होती. १ ते ३ मार्च असा तीन दिवस गुजरातच्या जामनगरमध्ये हा सोहळा पार पडला. हॉलिवूड, बॉलिवूड, उद्योग, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्ग्जांनी सोहळ्याला हजेरी लावली. हॉलिवूड, बॉलिवूड कलाकारांनी, गायकांनी लाईव्ह परफॉर्मन्सही दिले. तीन दिवसांनंतरही हा सोहळा काही संपल्याची चिन्ह नाहीत असंच आता दिसतंय. कारण काल शाहरुख, सलमान, जान्हवी कपूर, रणवीरस सिंहसह अनेक सेलिब्रिटी पुन्हा जामनगरमध्ये दाखल झाले होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री वेडिंग सोहळा तीन दिवस चालला. तर काल बुधवारी 6 मार्च रोजी अंबानींनी पुन्हा एकदा डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, शिखर पहाडिया, अरिजीत सिंह, रणवीर सिंह हे सेलिब्रिटी पोहोचले. रिलायन्स कुटुंबासाठी हे खास डिनर आयोजित करण्यात आलं होतं. शाहरुखने स्टेजवर येत स्पीचही दिलं.  'पठाण' आणि 'जवान' चे डायलॉग बोलत रिलायन्स इंडस्ट्रीजचे गुणगाम गायले. तर सलमान खान, रणवीर सिंहने डान्स परफॉर्मन्स दिला. सलमान 'जग घुमेया' गाण्यावर थिरकला. तर रणवीरने 'मल्हारी'गाण्यावर स्टेजवर आग लावली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

सेलिब्रिटी परत जामनगरमध्ये दाखल झाल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलीच मजा घेतली. 'अजून यांचं प्री वेडिंग संपलंच नाही का?','प्री वेडिंग पार्ट 2' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै ला मुंबईतच होणार आहे. त्याआधी दोघांनी अंबानी कुटुंबाच्या मूळ ठिकाणी म्हणजेच जामनगर येथे प्री वेडिंग केले. जगभरात या सोहळ्याची चर्चा झाली.

Web Title: Ambani pre wedding PART 2 Many celebrities including Shah Rukh, Salman again reached Jamnagar yesterday