'आदाई' चित्रपटातील न्यूड सीनची होतेय चर्चा, अभिनेत्रीनं केला या सीनच्या शुटिंगचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 14:50 IST2019-07-08T14:46:27+5:302019-07-08T14:50:39+5:30
ही अभिनेत्री आगामी चित्रपट आदाईमुळे चर्चेत आली आहे.

'आदाई' चित्रपटातील न्यूड सीनची होतेय चर्चा, अभिनेत्रीनं केला या सीनच्या शुटिंगचा खुलासा
अभिनेत्री अमाला पॉल आगामी चित्रपट आदाईमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात अमालानं बलात्कार पीडितेची भूमिका साकारली आहे. स्क्रीप्टनुसार अमाला हिला न्यूड शूट करावं लागलं. मागील काही दिवसांपूर्वी चित्रपटातील न्यूड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अमालाने या चित्रपटातील सीनवर खुलासा केला.
अमालाने चित्रपटातील सीनबद्दल द हिंदूला सांगितलं की, मी आदाई चित्रपटाचे दिग्दर्शक रत्ना कुमारला विचारले होते की सीन कसा असेल. कारण शूट करण्यापूर्वी मी खूप विचार करत होते.
अमाला म्हणाली की, मला या गोष्टीची चिंता वाटत होती की हे सगळं कसं होईल, सेटवर शूटिंगच्या वेळी किती लोक असती. चित्रीकरणावेळी फक्त १५ लोक उपस्थित होते. माझ्या संपूर्ण टीमवर विश्वास होता. त्यामुळे सीन करण्यासाठी तयार झाली.
अमाला पॉलच्या आदाई चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि हा टीझर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर न्यूड सीनमुळे खूप वाद झाले. सोशल मीडियावरील युजर्सनं ट्रोल केलं होतं. काही सेलेब्रिटी पुढे सरसावले आणि अमालाचं कौतूक केलं होतं.
न्यूड सीनबद्दल अमाला म्हणाली की,काही लोकांना चित्रपट पाहण्यापूर्वीच टीका करण्याची सवय असते. अशात आपण काय करू शकतो. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपट आहे.
तमीळ चित्रपट आदाई हा थ्रिलर ड्रामावर आधारीत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रत्ना कुमारने केले आहे.